अभिनयापासून ते मॉडेलिंगपर्यंत सगळ्यात तरबेज आहे उर्वशी, जाणून घेऊया तिचा प्रवास


उर्वशी रौटेला ही बॉलवूडमधील अनेक सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्यामुळे तिचा चाहता वर्ग देखील बराच मोठा आहे. ती तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करून आपल्या चाहत्यांना खुश ठेवत असते. प्रेक्षकही तिच्या फोटोजला भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. आज उर्वशीचा वाढदिवस तर जाणून घेऊया तिच्या जीवन प्रवासाबद्दल

उर्वशीने ‘सनी देओलच्या २०१३मध्ये आलेल्या ‘साहब जी द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने २०११ साली मिस यूनिवर्स या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच तिने ‘ब्युटी क्यून’ हा ताज देखील जिंकला होता. या व्यतिरिक्त तिने सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, हेट स्टोरी 4, पागलपंती, वर्जीन भानुप्रिया या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच उर्वशीने जगातील टॉप 10 सुंदर सुपर मॉडेलमध्ये आपल स्थान निर्माण केले आहे.

सुंदर अभिनेत्री उर्वशी रौटेला ही आपल्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत असते. ती तिच्या सोशल मीडियावर तिचे अनेक होत आणि बोल्ड फोटोज् शेअर करत असते. तिच्या चाहता वर्ग देखील खूप मोठा असल्याने तिला भरभरून प्रतिसाद देखील मिळतो. उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बिकनीपासून ते लिंगरीपर्यंत सगळे फोटो शेअर केले आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ई- टाईम्स सोबत बोलताना उर्वशीने असे सांगितले की, ” माझा प्रेमावर खूप विश्वास आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये सकारात्मक बदल होत असतात, ज्यामुळे तुम्हाला जगातील प्रत्येक गोष्टच खूप सुंदर वाटू लागते. त्या वेळी तुमच्या शरीरात डोपामाइन नावाचा हार्मोन रिलीज होत असतो. त्यामुळे तुम्ही खूप खुश राहता.” उर्वशी लवकरच तिच्या आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

उर्वशीचा जन्म 25 फेब्रुवारी 1994 मध्ये कोटाडवर येथे झाला आहे. आज उर्वशी 27 वर्षाची पूर्ण झाली आहे. लहानपणापासून उर्वशीला फॅशन आणि मॉडेलिंगची खूपच आवड होती. आणि तिने पुढे जाऊन देखील तेच क्षेत्र निवडले.


Leave A Reply

Your email address will not be published.