Tuesday, October 14, 2025
Home साऊथ सिनेमा मुलगी सिताराचे महेश बाबूसोबत पदार्पण, ‘सरकारु वारी पाटा’मधील ‘पेनी’ गाण्याचा प्रोमो रिलीझ

मुलगी सिताराचे महेश बाबूसोबत पदार्पण, ‘सरकारु वारी पाटा’मधील ‘पेनी’ गाण्याचा प्रोमो रिलीझ

टॉलिवूड सुपरस्टार महेश बाबूच्या (Mahesh Babu) चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा आगामी चित्रपट ‘सरकारु वारी पाटा’ प्रेक्षकांसाठी आणखी खास आहे. कारण या चित्रपटात सुपरस्टारची मुलगी सितारा घट्टामनेनी  (Sitara Ghattamaneni) देखील दिसणार आहे. ‘सरकारु वारी पाटा’ या चित्रपटातील पेनी गाण्याचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये सितारा देखील दिसत आहे. हा प्रोमो चाहत्यांना खूप आवडला आहे.

पेनीचा प्रोमो झाला प्रदर्शित
‘सरकारु वारी पाटा’ (Sarkaru Vaari Paata) चित्रपटाच्या निर्मात्यांनी पेनी या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये एकीकडे महेश बाबूचा स्वॅग पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे छोटी निताराही खूप क्यूट दिसत आहे. त्याचवेळी व्हिडिओमध्ये नितारा अतिशय स्टायलिश स्टाईलमध्ये डान्स मूव्ह्ज करताना दिसत आहे. पेनीच्या प्रोमो व्हिडिओसोबतच तिचे पूर्ण गाणे २० मार्चला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे गाणे पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

पेनीची इंस्टाग्राम पोस्ट
सिताराने तिच्या इंस्टाग्रामवर पेनीचा प्रोमो शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना, सिताराने लिहिले की, “#Penny साठी #SarkaruVaariPaata च्या अप्रतिम टीमसोबत सहयोग करताना खूप आनंद होत आहे. नन्ना, मला आशा आहे की, मी तुम्हाला अभिमान वाटेल.” ‘सरकारु वारी पाटा’च्या संपूर्ण टीमने ‘प्रिन्सेस’ चे स्वागत केले आहे. सिताराचे इंस्टाग्राम अकाउंट व्हेरिफाईड आहे आणि तिची फॅन फॉलोअर्स चांगली आहे.

सरकारु वारी पाटा’ १२ मे रोजी होणार प्रदर्शित
माध्यमांतील वृत्तानुसार, सिताराने ॲनी मास्टरकडून डान्सचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर पेनीची तयारी देखील केली आहे. चाहते सिताराचे अभिनंदन करत आहेत. विशेष म्हणजे ‘सरकारु वारी पाटा’चे दिग्दर्शक परशुराम असून, कीर्ती सुरेश या चित्रपटात महेश बाबूसोबत दिसणार आहेत. हा चित्रपट १२ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. महेश बाबूला पहिल्याच चित्रपटासाठी राज्य नंदी पुरस्कारही मिळाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा