Tuesday, May 21, 2024

‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीने वयाच्या 60व्या वर्षी थाटला संसार, सोशल मीडियावर मिळाले खरे प्रेम

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी इंडस्ट्रीमधील अनेक चित्रपटमध्ये काम केले असून प्रत्येक भूमिकेमध्ये आपली वेगळीच छाप सोडली. सुहासिनी यांनी आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली असून अभिनेत्री आपल्य वैयक्तीक आयुष्यामुळे देखिल खूपच चर्चेत होत्या. म्हणतातना की, प्रेमाला कोणतेच वय नसते तर ही गोष्ट सुहासिनी यांनी सिद्ध करुन दाखवली आहे. सुहासिनी रविवार (दि, 20 नोव्हेंबर) रोजी आपला 72 वा वाढदिवास साजरा करत आहेत. या खास दिवशी त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी मुळे (Suhasini Mulay) यांचा जन्म 1950 साली पटना बिहार मध्ये झाला होता. अभिनेत्रीने अनेक चित्रपटामध्ये काम करुन आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्ष राज्य केले आहे. सुहासिनी यांनी 60 वर्षाच्या असताना त्यांना खरे प्रेम सापडले आणि त्यांनी संसार देखिल थाटून दाखवला. अभिनेत्री आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे सततल प्रेक्षकांचे लक्षल वेधत होत्या.

1969 साली अभिनयाला केली सुरुवात
अभिनेत्री सुहासिनी मुळे यांचा जन्म (दि, 20 नोव्हेंबर 1950) साली पटनामधील मराठी कुटुंबात झाला होता. तिथे त्यांनी आपले लहाणपन काढले. सुहासिनी अवघ्या तीन वर्षाच्या असताना त्यांच्या वडीलाचे निधन झाले. यानंतर त्यांचा सांभाळ त्यांची आई आणि चित्रपट निर्माता विजया मुळे यांनी केला. आपल्या आईमुळे अभिनेत्री चित्रपटात काम करण्याला आकर्षीत झाल्या आणि 1969 साली ‘भुवन सोम’ या चित्रपटातुन अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्यांनी ‘जोधा अकबर’, ‘दिल चाहता है’, ‘लगान’, ‘हमराज’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’ सारख्या अनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले. त्याशिवय त्यांनी टेलिव्हिजनवरील मालिकामध्ये देखिल काम केले.

अशी सुरु झाली लव्हस्टोरी
अभिनेत्री सुहासिनी मुळे यांना सोशल मीडियावर भौतिकी वैज्ञानिक अतुल गुर्टु (Atul Gurtu)यांच्याशी प्रेम झाले. यांचे प्रेमप्रकरण फेसबुकद्वारे सुरु झाले . अतुल हे आधीच विवाहीत होते, पण काही दिवसांनी त्यांच्या पत्नीचा कॅन्सरसारख्या घातक आजाराने निधन झाले. यानंतर त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती, त्याला वाचूनच सुहासिनी यांनी अतुल यांच्याशी संपर्क साधला. हळू हळू यांच्यामद्ये जवळीक वाढली आणि त्यांना एकमेकांशी प्रेम झाले.

suhasini mulay 2

चार वर्षापर्यत लपवले लग्न
काही दिवसानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि (दि, 16 जानेवारी 2011) साली आर्य सामज मंदिरामध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली, तेव्हा सुहासिनी यांचे वय 60 वर्ष असून अतुल गुर्टु यांचे वय 65 होते. मात्र, लग्नची गोष्ट 4 वर्षानंतर बाहेर आले होती. यांच्या लग्नाची बातमी ऐकूण घरातील सदस्यच नाही तर चाहकही हैराण झाले होते. मात्र, आज त्यांच्या जोडीचे कौतुक केले जाते, एक आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

suhasini mulay3

राष्ट्रीय पुरस्कार
अभिनेत्री यांनी भले आपल्या वैयक्तीक आयुष्यामध्ये अनेक गोष्टी केल्या असतील पण त्यांच्यापुढे त्यांच्या अभिनयाला नकार देता येणार नाही. त्यांनी अनेक चित्रपटामध्ये आई, आज्जी सारख्या अनेक भूमिका स्वीकरल्या आहेत. आजही त्यांच्या अभिनयाची प्रशंसा केली जाते. 1999मध्ये त्यांना ‘हू तू तू’ल या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
तुषार बघायचा करीनाची 12-14 तास वाट, स्टारकिड असूनही केले हाेते दुर्लक्षित
करीना कपूरसोबत केली होती अभिनयाची सुरुवात, तर ‘असा’ होता तुषार कपूरच्या कारकिर्दीचा आलेख

हे देखील वाचा