Sunday, March 15, 2026
Home बॉलीवूड भोजपुरी सिनेमाचे पहिले सुपरस्टार होते सुजीत कुमार, बॉलिवूडमध्येही कमावलंय नाव

भोजपुरी सिनेमाचे पहिले सुपरस्टार होते सुजीत कुमार, बॉलिवूडमध्येही कमावलंय नाव

हिंदी चित्रपट क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी बॉलिवूडसह इतरही भाषांमध्ये चित्रपट करून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यामध्ये सर्व प्रथम नाव घेतले जाते ते म्हणजे अभिनेता सुजीत कुमार (Sujit Kumar) यांचे. सोमवारी (७ फेब्रुवारी) अभिनेत्यांचा वाढदिवस असतो. या निमित्ताने जाणून घेऊया या लोकप्रिय अभिनेत्याबद्दल खास गोष्टी…

सुजीत कुमार हे हिंदी चित्रपट जगतातील आघाडीचे अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. ७०-८०च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत लोकप्रियता मिळवली होती. त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९३४ मध्ये झाला.

सुजीत कुमार यांना चित्रपटात काम करण्यात विशेष रस नव्हता. ते चित्रपटात येण्यापूर्वी वकिलीचे शिक्षण घेत होते. शिकत असताना त्यांनी एका नाटकात भाग घेतला होता. यावेळी परीक्षक म्हणून आलेले प्रसिद्ध दिग्दर्शक फणी मजूमदार यांना त्यांचा अभिनय खूप आवडला. त्यांनी सुजित कुमार यांना चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला. इथूनच त्यांनी अभिनयाकडे मोर्चा वळवला. मात्र या क्षेत्रात आल्यानंतर त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. त्यांनी १५० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले. सुपरस्टार राजेश खन्नासोबत त्यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. फक्त नायक नव्हे, तर त्यांच्या खलनायकाच्या भूमिकाही प्रचंड गाजल्या. सुजित कुमार यांनी हिंदी चित्रपटांसह अनेक भोजपुरी चित्रपटात सुद्धा काम केले आहे.

किशोर कुमार यांनी ‘दूर गगन की छाव में’ या चित्रपटात सुजित कुमार यांना पहिल्यांदा संधी दिली होती . इथूनच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी अनेक भोजपुरी चित्रपटातही मुख्य भूमिका निभावल्या आहेत. भोजपुरी सिनेसृष्टीतील पहिला रंगीत चित्रपट ‘दंगल’चे ते अभिनेते होते. त्यांनी ‘आराधना’, ‘मेहबूबा’, ‘हाथी मेरे साथी’ ‘अमर प्रेम’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात अभिनय केला आहे. २००७ मध्ये त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. तर २०१०मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

हे देखील वाचा