प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. जॅकलीनने तिचा बोल्ड अंदाज दाखवून अनेक चाहत्यांच्या मनात स्वत:ची अशी एक वेगळी जागा निर्माण केली आहे. जॅकलीनचे लाखो चाहते आहेत. जॅकलीन सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या फोटो आणि व्हिडिओवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.पण सध्या जॅकलीन तिच्या फोटोमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
कथित करोडपती फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहे. या प्रकरणात जॅकलिनचेही (Jacqueline Fernandez Bold Photo) नाव असून तिची या संदर्भात अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. मात्र, अभिनेत्रीने गँगस्टरशी संबंध असल्याचा इन्कार केला आहे. जॅकलिनच्या या दाव्यांमध्ये सुकेश तिला तुरुंगातून वेळोवेळी प्रेमपत्रे लिहित असतो.ख्रिसमसच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याने जॅकलिनसाठी एक प्रेमपत्र (A love letter to Jacqueline)लिहिले आहे.
सुकेशने (Sukesh Chandrasekhar) पत्र लिहिताना लिहिले की, “बेबी, सर्वप्रथम, मी तुला सांगू इच्छितो की, मला तुझ्यासाठी खूप आनंद होत आहे. मनोरंजन उद्योगातील तुझ्या योगदानाबद्दल तुला विशिष्ट आंतरराष्ट्रीय अरब महोत्सव पुरस्कार (DIAFA) 2023 मध्ये सन्मानित करण्यात आले आहे. माझ्या प्रिये तुझ्यासाठी मी किती आनंदी आहे, याची तुला कल्पना नाही. तु भारतीय मनोरंजन जगतातील एक उत्कृष्ट कलाकार आहे.”
तसेच त्याने पुढे लिहिले की, “‘तु अवॉर्ड फंक्शनमध्ये पांढऱ्या गाऊनमध्ये अप्रतिम दिसत होती. बाळा तुला पाहून मी थक्क झालो. तू माझे जग आहेस’. याशिवाय सुकेशने पत्रात जॅकलिनच्या इतर काही फोटोंचाही उल्लेख केला आहे. त्याने लिहिले, ‘बेबी, तुझे अलीकडील दोन फोटो ज्यामध्ये तू लाल अरबी पोशाख आणि गुलाबी साडीमध्ये दिसत आहेस. ते खूप सुंदर आहेत. परंतु चमकदार लेहेंगामधील तुझ्या फोटोशूटने माझे मन चोरले आहे. बाळा, या ग्रहावर तू एकमेव देवदूत आहेस.”
“माझ्या सर्व आनंदाची सुरुवात तुझ्यापासून होते, मी तुझ्यावर प्रेम करतो. तु ज्या समस्यांमधून गेली त्याबद्दल मला पुन्हा एकदा गुडघ्यावर बसून तुमची माफी मागायची आहे. तुझ्या डोळ्यात बघून मला तुला पुन्हा प्रपोज करायचं आहे.” असेही सुकेशने त्याच्या पत्रात लिहिले आहे. या पत्राची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. (Sukesh Chandrasekhar rewrote a love letter to Jacqueline straight from jail)
आधिक वाचा-
–Siddharth Shukla |बापरे! तब्बल ‘इतक्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेला सिद्धार्थ शुक्ला; आकडा तर वाचाच
–‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीविरोधात अटक वॉरंट जारी? एकदा वाचा काय आहे प्रकरण