Monday, July 15, 2024

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस पुरती फसली, जेलमध्ये जाण्याची शक्यता

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या(Jacqueline Fernandez) अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने कथित आरोपी सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandrashekhar) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला समन्स बजावले आहे. पतियाळा हाऊस कोर्टाने जॅकलिनला 26 सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राचीही न्यायालयाने दखल घेतली आहे.

रिपोर्टनुसार ईडीने केलेल्या चौकशीत जॅकलिन खंडणीच्या पैशाची लाभार्थी असल्याचे आढळले होते. ठग सुकेश चंद्रशेखर हा खंडणीखोर असल्याचे जॅकलिनला माहीत होते असा ईडीचा दावा आहे. मुख्य साक्षीदार आणि आरोपींच्या जबाबावरून जॅकलीन फर्नांडिस व्हिडिओ कॉलद्वारे सुकेशच्या सतत संपर्कात होती असे दिसून आले आहे.

दरम्यान ईडीने जॅकलिनवर आरोपपत्र दाखल केलं आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला 10 कोटीचे गिफ्ट्स दिले होते आणि हा सर्व पैसा 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील असल्याच ईडीने दाखल केलल्या आरोपपत्रात म्हटले आहे. जॅकलिनला याची सर्व माहिती होती आणि असं असतानाही तिने गिफ्ट घेतले. त्यामुळे तिला आरोपी करुन घेण्यात आले आहे.

यापूर्वी ईडीला सुकेश चंद्रशेखरने 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू पाठवल्याचं आढळून आलं होतं. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत आतापर्यंत जॅकलिनची 7 कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. सुकेश चंद्रशेखर विरुद्ध अनेक राज्यांचे पोलिस आणि सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय आणि प्राप्तिकर या तीन केंद्रीय एजन्सीद्वारे 32 हून अधिक गुन्हेगारी प्रकरणांचा तपास सुरू आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
कॅटरिनाने साडी नेसून लावले जोरदार ठुमके, पाहून सलमानने घेतली डुलकी; व्हिडिओवर खिळल्या सर्वांच्या नजरा
‘भारतीय आई-वडील तुम्हाला मारून टाकतील…’, प्रसिद्ध अभिनेत्रीवर वीर दासने साधला निशाणा
शंभराहून अधिक कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या सिनेमाने केलेला शाहरुखचा घात, सोसावे लागलेले मोठे नुकसान

हे देखील वाचा