Tuesday, August 12, 2025
Home अन्य ‘माझी माफी…’, सुकेश चंद्रशेखरने चाहत खन्नाला पाठवली 100 कोटींची कायदेशीर नोटीस

‘माझी माफी…’, सुकेश चंद्रशेखरने चाहत खन्नाला पाठवली 100 कोटींची कायदेशीर नोटीस

महाठगी सुकेश चंद्रशेखर याला तब्बल 200 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणामध्ये अटक झाली आहे. गेल्या अनेक महिन्यापसून तो कोठडीत आहे. या प्रकरणामध्ये अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही सारख्या अनेक अभिनेत्रींचे नावे समोर आली होती. अशातच त्याने अभिनेत्री चाहत खन्नाला 100 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्याशिवया आभिनेत्रीवर आरोपही केला आहे.

सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याने तब्बल 200 कोटींचा घोटाळा केलेल्या प्रकरणात त्याला अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुकेश कोठडीत बंदीस्त आहे. मात्र, तिथे असूनही तो त्याची मते मांडत असतो. त्याने नुकतंच अभिनेत्री चाहत खन्ना (Chata Khanna)ला कायदेशीर नोटीस पाठवली आहे असून तो म्हणाला की, तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मीडियासमोर माझ्याबद्दल चुकीची माहिती दिली आहे. त्याच्यामुळे सुकेशच्या सामाजिक इमेजवर मोठा परिणाम पडला आहे.

मीडियाचे लक्ष वेधण्याचा होता प्रयत्न
नेटीसमध्ये लिहेल होते की, सुकेश चंद्रशेखर यांच्याबद्दल मीडियाला मुलाखत देताना चाहत खन्ना यांनी चुकीच्या आणि अपमानास्पद गोष्टी सांगितल्या आहेत, त्याच्या मागचं कारण म्हणजे ते मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे सगळं केलं आहे, असे नोटीसमध्ये म्हटलं आहे. अभिनेत्री चाहत खन्ना हिने भारतीय चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी माध्यमांमध्ये सुकेश चंद्रशेखवर चुकीचं आणि अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. कारण तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:च स्थान निर्माण कारयचं आहे.

कायदेशीर नोटीस पाठवत माफी मागण्याची मागणी
सुकेश चंद्रशेखरच्या वकिलाने अभिनेत्री चाहत खन्नाला कायदेशीर नोटीस पाठवून मीडियामध्ये तिच्या विरोधात केलेल्या चुकीच्या आणि अपमानास्पद वक्तव्याबद्दल माफी मागणारे वक्तव्य जारी करण्यास सांगितले आहे. ही माफी 7 दिवसांच्या आत करावी. सुकेश चंद्र शेखर यांच्या वकिलाने म्हटले आहे की, “अभिनेत्री चाहत खन्ना हिने 7 दिवसांत कोणतेही वक्तव्य जारी केले नाही तर तिच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. ” काही दिवसांपूर्वी चाहत खन्नाने एका मुलाखतीदरम्यान मीडियासमोर वक्तव्य केले होते त्यावेळी तिने सुकेशसाठी अपमानस्पद शब्दांचा वापर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
कियाराच्या मंगळसूत्रासाठी सिद्धार्थने खर्च केले तब्बल इतके काेटी, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
आपल्या एक्सच्या लग्नात हसत – हसत सहभागी झाले ‘हे’ बॉलिवूड स्टार्स, एकदा पाहाच यादी

हे देखील वाचा