दुसऱ्या मुलाच्या मृत्यूच्या खोट्या बातमीने चिडलेले अभिनेते शेखर सुमन, पहिल्या मुलाचा अकाली मृत्यूने पुर्णतः खचले होते

दुसऱ्या मुलाच्या मृत्यूच्या खोट्या बातमीने चिडलेले अभिनेते शेखर सुमन, पहिल्या मुलाचा अकाली मृत्यूने पुर्णतः खचले होते


बॉलिवूड अभिनेता अध्ययन सुमन याच्याबद्दल आजकाल अनेक अफवा पसरल्या आहेत. नुकतीच अध्ययन याने आत्महत्या केल्याची बातमी सगळीकडे व्हायरल झाली होती. या अश्या खोट्या बातमीमुळे अध्ययनचे वडील शेखर सुमन हे खूपच नाराज आहेत.

याबाबत बोलताना शेखर सुमन यांनी सांगितले की, ‘जेव्हा ही बातमी व्हायरल झाली तेव्हा अध्ययन आणि आमचं संपूर्ण कुटुंब दिल्लीमध्ये होतो. ही बातमी ऐकुन आमच्या पायाखालची जमीन सरकली होती. चॅनलने अशी खोटी बातमी पसरवून आमच्या भावना दुखावल्या आहेत. यासाठी चॅनेलने आमची माफी मागायला पाहिजे.’

Shekhar Suman Tweet Ac SS
Shekhar Suman Tweet Ac SS

शेखर सुमन यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. एक वेळ तर अशी आली होती की ते पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेले होते.

शेखर यांचा मोठा मुलगा आयुष याला हृदयाचा एक आजार होता. ज्यामुळे वयाच्या 11व्या वर्षीच त्याचा मृत्यू झाला होता. आपल्या एवढ्या मोठ्या मुलाला गमावल्यामुळे ते खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला जगण्याची कोणतीच इच्छा उरली नव्हती.

शेखर यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगिलते होते की, आयुषच्या मृत्यूनंतर त्यांचे जीवन पूर्व पदावर यायला खूप काळ जावा लागला. त्यांचा दुसरा मुलगा अध्ययन याचा जन्म 1988 मध्ये झाला. त्याला ‘देख भाई देख’ या टीव्ही सीरियलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर शेखर यांची इंडस्ट्रीमध्ये चांगलीच ओळख निर्माण झाली.

शेखर यांची पत्नी अलका हिने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की,”आम्ही मागील 38 वर्षापासून एकत्र आहोत. आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले. पण कधी एकमेकांची साथ नाही सोडली. आम्ही दोघे एक मेकांचे सगळ्यात मोठे आधार आहेत.”


Leave A Reply

Your email address will not be published.