Tuesday, April 23, 2024

तामिळ परिवारात जन्मूनही अस्खलित मराठी बोलणाऱ्या सुमित राघवनने भूतदया दाखवत घेतले चक्क वाघालाच दत्तक

मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वातील प्रतिभावान अभिनेता म्हणून सुमित राघवनला ओळखले जाते. एक प्रभावी अभिनेत्यासोबतच तो एक उत्तम व्यक्ती देखील आहे. आज २२ एप्रिल रोजी सुमित त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ओळखीचे नाव म्हणजे सुमित राघवन. सध्या हिंदी टेलिव्हिजनमध्ये जास्त सक्रिय असणाऱ्या सुमितला अमाप फॅन फॉलोविंग आहे. कोणत्याही गोष्टीबाबत नेहमीच त्याचे विचार एकदम स्पष्ट असतात. त्याच्या या गुणाचे अनेक खूपच कौतुक वाटते.

सुमित सध्या ‘वागले की दुनिया’ या मालिकेतून सर्वांना भेटत आहे. मात्र सुमितने या क्षेत्रात अतिशय उत्तम आणि विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. मुंबईमध्ये एका तामिळ परिवारात सुमितचा जन्म झाला. सुरुवातीपासूनच त्याला अभिनयाची आवड होती. सुमितने त्याच्या अभिनयाची सुरुवात १९८७ साली आलेल्या ‘फास्टर फेणे’पासून केली. पुढे तो बी आर चोप्रा यांच्या महाभारतात देखील झळकला. यात त्याने श्रीकृष्णाच्या मित्राची सुदामाची भूमिका साकारली होती. नक्कीच ही भूमिका त्याच्यासाठी चांगली होती, मात्र करियरला वळण देणारी नव्हती. पुढे त्याच्या आयुष्यात आला ‘साराभाई वर्सेस साराभाई’ हा शो. या शोने तर त्याला एका रात्रीत लोकप्रिय केले.

सुमितने साराभाई नंतर कधीच मागे वळून पहिले नाही. त्याने सजन रे झूठ मत बोलो, बड़ी दूर से आए हैं आदी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले. यासोबतच तो बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील झळकला. अक्षयच्या ‘हॉलिडे’ सिनेमात त्याने अक्षयच्या मित्राची भूमिका साकारली होती. सुमितने १९९६ साली चिन्मयी सुर्वेसोबत लग्न केले. चिन्मयी देखील मनोरंजनविश्वात सक्रिय असून तिने देखील अनेक हिंदी मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

सुमित अतिशय चांगला व्यक्ती आहे. सोबतच त्याच्यात भरभरून भूतदया आहे. तो मुक्या प्राण्यांवर अतोनात प्रेम करतो. त्याच्यात घरत पाहुण्यासाठी जेवढी जागा असते, तेवढीच रस्त्यावरील कुत्र्यांसाठी देखील असते. सुमितने एका वाघाला देखील दत्तक घेतले आहे. दरम्यान सुमित अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम करत असतो. यासोबतच त्याने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केले आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

धक्कायदायक! ‘या’ जेष्ठ अभिनेत्रीचा विनयभंग, फोनवर पाठवले जाताय अश्लील मेसेज आणि फोटो

दलाई लामा आणि बाइडन यांच्या मैत्रीवर केलेली ‘ती’ पोस्ट क्वीनच्या अंगाशी, ऑफिसच्या बाहेर निर्दशने पाहून कंगनाने मागितली माफी

हे देखील वाचा