Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘विविधतेच्या रंगांचा उत्सव साजरा करू’, म्हणत सुनील शेट्टीने दिल्या देशाच्या अमृतमहोत्सवी स्वतंत्रदिनाच्या शुभेच्छा!

आज आपला देश स्वातंत्र्याचा ७५ व्या स्वातंत्र्यदिनी साजरा करत आहे. १९४७ साली भारत इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र देश म्ह्णून घोषित झाला. या दिवसाचे औचित्य साधून, आजच्या दिवशी आम पासून खासपर्यंत सर्वच लोकं एकमेकांना या अमृत महोत्सवी स्वतंत्रदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. याला बॉलिवूड देखील अपवाद नाही. कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून देशवासियांना शुभेच्छा देत त्यांच्या मनातील भावना देखील व्यक्त केल्या आहेत.

अभिनेता सुनील शेट्टीने देखील त्याच्या स्टाईलमध्ये एक पोस्ट शेअर करत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुनीलने त्याचा एक फोटो शेअर केला असून, एक खास संदेश देखील दिला आहे. या फोटोमध्ये सुनीलने पांढऱ्या रंगाचा धोती कुर्ता घातला असून, तो तिरंग्याला त्याच्या खास अंदाजमध्ये नमस्कार करताना दिसत आहे. (suniel shetty wishes on 75th independence day)

सुनील शेट्टीने त्याचा फोटो शेअर करताना लिहिले, “जिथे मनात भीती नाही आणि डोके नेहमी उंच असावे. या आमच्यासोबत विविधतेच्या सर्व रंगांचा उत्सव साजरा करू. कारण माझा भारत, तुमचा भारत, आपला भारत, स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहे. सर्व वीरांना सलाम, आपल्या लोकांना सलाम.”

अतिशय सुंदर आणि समर्पक देशाचे वर्णन करणाऱ्या शब्दांमध्ये सुनीलने त्याचा संदेश लिहिले आहे, ज्यात त्याने देशाच्या वीरांसोबतच नागरिकांनाही सलाम केला आहे. सुनीलची ही पोस्ट आणि त्याचा हा संदेश सर्वच नेटकऱ्यांना भावात असून, त्यावर सर्वजण त्याला प्रतिक्रिया देखील देत आहेत.

सुनील शेट्टीने आतापर्यंत बॉलिवूड, साऊथ अशा जवळपास १२० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एक ऍक्शन हिरो म्हणून तो सर्वांसमोर आला आणि हिट देखील झाला. एक उत्तम आणि हिट अभिनेत्यासोबतच तो एक यशश्वी उद्योजक देखील आहे.

‘बलवान’, ‘वक्त हमारा है’, ‘पहचान’, ‘दिलवाले’, ‘अंत’, ‘मोहरा’, ‘गोपी किशन’, ‘हम हैं बेमिसाल’, ‘सुरक्षा’, ‘रघुवीर’, ‘गद्दार’, ‘टक्कर’, ‘एक था राजा’, ‘विश्वासघात’, ‘कृष्णा’, ‘शस्त्र’, ‘सपूत’, ‘रक्षक’, ‘बॉर्डर’, ‘पृथ्वी’, ‘भाई’, ‘आक्रोश’, ‘क्रोध’, ‘हेराफेरी’, ‘रिफ्यूजी’, ‘जंगल’, ‘धड़कन’, ‘हेरा फेरी’ आदी अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.

सध्या सुनील त्याची मुलगी अथिया शेट्टी आणि के.एल. राहुल यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे सतत लाईमलाईट्मधे येत आहे. लवकरच त्याचा मुलगा अहान शेट्टीदेखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

स्वातंत्र्यदिन विशेष!! जेव्हा भारतातील ‘या’ चित्रपटांना घाबरला होता पाकिस्तान, थेट घातली गेली त्यावर बंदी

बॉलिवूडमधील असे कलाकार ज्यांना लाभलीय लष्करी पार्श्वभूमी; सुष्मितापासून ते प्रियांकापर्यंत ‘यांचा’ आहे समावेश

हे देखील वाचा