Tuesday, August 12, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडचा ‘तो’ चित्रपट, ज्यात आहे एकच अभिनेता; गिनीज बुकमध्ये नोंदवलं गेलंय ‘यादें’चं नाव

बॉलिवूडचा ‘तो’ चित्रपट, ज्यात आहे एकच अभिनेता; गिनीज बुकमध्ये नोंदवलं गेलंय ‘यादें’चं नाव

सुनील दत्त (Sunil Dutt) यांचे चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे. ‘मदर इंडिया’ या चित्रपटातून त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ते असंख्य चित्रपटांमध्ये दिसले. कधी हिरो बनून त्यांनी चाहत्यांची मने जिंकली, तर कधी नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांना घाबरवले. त्यांचे चित्रपट, त्यांचा अभिनय आणि त्यांचे गांभीर्य कधीच विसरता येणार नाही. पण तुम्हाला माहित आहे का, की त्यांनी २ तासांचा असा चित्रपट बनवला ज्याचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे. या चित्रपटात एकच अभिनेता आहे आणि ते म्हणजे सुनील दत्त स्वतः!

या चित्रपटाचे नाव आहे- ‘यादें’. हा १९६४ मध्ये रिलीझ झाला होता. या ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय सुनील दत्त यांनी केले होते. त्यांनी ६०च्या दशकातच इतका मोठा प्रयोग केला, ज्यासाठी त्यांना आदरही मिळाला. (sunil dutt yaadein film in guinness book of world records only one single actor work in movie)

नर्गिस दत्त यांची सावली
संपूर्ण चित्रपटात सुनील दत्त नर्गिस दत्त (Nargis Dutt) यांचा फोटो आणि त्यांची सावली यांच्या मदतीनेच अभिनय करत आहेत. त्यांनी अभिनयही उत्तम केला आहे. या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केल्याचे बोलले जाते.

प्रेक्षकांना दाखवली नवी गोष्ट
सुनील दत्त यांनी त्या काळात प्रेक्षकांना व्हिज्युअल एक्सप्रेशन silhouetteची ओळख करून दिली. इतर व्यक्तिमत्व दर्शविण्यासाठी काळ्या सावलीचा वापर केला गेला होता.

चित्रपटाची कथा
कथेबद्दल सांगायचे झाले तर, एक घर आहे ज्यामध्ये अनिल (सुनील दत्त) राहतो. तो संपूर्ण घर शोधतो, परंतु त्याला त्याची पत्नी आणि मुले दिसत नाहीत. पत्नीशी झालेल्या भांडणापासून ते आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत ही कथा आहे. कथेत सुनील दत्तचे पात्र सोडले, तर बाकी सर्वांचा केवळ आवाज ऐकू येतो.

लता मंगेशकर यांनी गायले होते गाणे
या चित्रपटातील आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे, यात फक्त दोन गाणी होती. जी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी गायली होती. चित्रपटाचे संवाद आणि संगीत वसंत देसाई यांनी दिले होते.

१९५५मध्ये केलं पदार्पण
सुनील दत्त यांना १९६८ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात रेडिओपासून केली होती. त्यानंतर ते हिंदी चित्रपटांकडे वळले आणि १९५५ मध्ये ‘रेल्वे प्लॅटफॉर्म’मधून पदार्पण केले. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ओम शांती ओम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा