Saturday, June 29, 2024

द कपिल शर्मा शो फेम सुनिल ग्रोव्हरवर आली छोले कुल्चे विकण्याची वेळ, सोशल मीडियावर रस्त्यावरील व्हिडीओ होतोय व्हायरल

सुनील ग्रोव्हर हा केवळ विनोदी कलाकारच नव्हे तर एक कौशल्यपूर्ण अभिनेता देखील आहे. अलीकडेच आलेल्या ‘तांडव’ वेब सीरिजमध्ये याची एक झलक आपल्याला पाहायला मिळाली. सुनील ग्रोव्हर आपल्या कामासोबतच सोशल मीडियावर नेहमी त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.

नुकताच व्हॅलेंटाईन डेनिमित्त त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो रस्त्यावर छोले कुल्चे बनवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तो लोकांची सेवाही करताना दिसला आहे.

व्हिडिओ शेअर करताना सुनील ग्रोव्हरने एक छान कॅप्शन देखील दिले आहे. सुनील ग्रोव्हरने शेअर केलेल्या व्हिडिओला कॅप्शनमध्ये लिहिले, “व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या पार्टनरला छोले कुल्चे नक्कीच खाऊ घाला”. सुनील ग्रोव्हरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

तसेच,रविवारी व्हॅलेंटाईन डे होता. या दिवसाला ‘प्रेमाचा दिवस’ असेही संबोधले जाते. व्हॅलेंटाईनडेच्या दिवशी लोक त्यांच्या पार्टनरला खास अनुभव देण्यासाठी आणि त्यांना सरप्राइज करण्यासाठी विविध भेटवस्तू देत असतात. परंतु, सुनील ग्रोव्हरच्या म्हणण्यानुसार, या दिवशी आपल्या जोडीदाराला छोले कुल्चे खाऊ घालावे.

सुनील ग्रोव्हरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणले, तर त्याची ‘तांडव’ ही वेब सिरीज नुकतीच रिलीज झाली. यात सुनील ग्रोव्हरने सैफ अली खान, गौहर खान, डिंपल कापडिया आणि जीशान अय्यूब या कलाकारांसह मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेत सुनील ग्रोव्हरचा अभिनय शैली अगदी पाहण्यासारखी होती. यापूर्वी सुनील ग्रोव्हरने ‘गब्बर इज बॅक’ आणि ‘भारत’ सारख्या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सुनील ग्रोव्हरने ‘द कपिल शर्मा शो’ च्या माध्यमातून चाहत्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या शोमध्ये तो ‘मशहूर गुलाटी’चे पात्र साकारायचा. त्याच्या या पात्राने लाखो लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. त्याने थिएटर, रेडिओ, टीव्ही तसेच चित्रपटांमध्येही काम केले आहे. आज तो विनोदी जगात एक नावाजलेले नाव बनला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा
गायब झालेला फॅन्ड्रीचा  जब्या पुन्हा येतोय रे! या चित्रपटाद्वारे करणार  दणका कमबॅक
द कपिल शर्मा शोच्या सेटवर कृष्णा आणि अर्चना करतायत चोरीचा प्लॅन  व्हिडिओ झाला  लीक 
मुकेश खन्नापासून ते एमएस धोनी; या ४ सेलिब्रिटींनी कपिल शर्मा शोवर येण्यास दिला होता नकार

हे देखील वाचा