Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

सनी देओल आणि डिंपल कपाडियाचे अफेअर एवढे गाजले होते की, अभिनेत्रीची मुले देखील त्याला म्हणायचे ‘छोटे पप्पा’

सनी देओल (Sunny deol)  हा हिंदी चित्रपट जगतातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.  आपल्या दमदार अभिनयाने सनी देओलने हिंदी चित्रपट जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ९० च्या दशकातील प्रतिभावान अभिनेता म्हणून सनी देओलच्या नावाची चर्चा होत असते. अभिनेता सनी देओल जितका त्याच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध होता तितकीच त्याच्या प्रेम प्रकरणांचीही या काळात जोरदार चर्चा रंगली होती. यामध्ये सर्वात जास्त अभिनेत्री डिंपल कपाडिया(Dimple Kapadia) आणि सनी देओलच्या नावाची सर्वात जास्त चर्चा झाली. काय होती ही भन्नाट लवस्टोरी चला जाणून घेऊ.

अभिनेता सनी देओलच्या ९० च्या दशकातील चित्रपटांची नेहमीच चर्चा होत असते. या काळात अँग्री यंग मॅन अशी सनी देओलची खास ओळख होती. याकाळात सनी देओलच्या चित्रपटांची चर्चा तर झालीच त्याचबरोबर सनीची अनेक नायिकांसोबतची प्रेमप्रकरणेही प्रचंड गाजली. अभिनेता सनी देओलचे पहिल्यांदा अमृता सिंगसोबत नाव जोडले गेले होते. दोघांमध्ये चांगलीच जवळीकता वाढली होती. दोघांचा ‘बेताब’ चित्रपट चांगलाच गाजला. याच दरम्यान त्यांच्यात प्रेमाचे नाते निर्माण झाले होते. मात्र जेव्हा सनी देओल विवाहित आहे हे अमृता सिंगला समजले तेव्हा तिला प्रचंड राग आला ज्यामुळे तिने सनीपासून लांब राहायला सुरूवात केली. अमृता सिंगसोबतच्या वादानंतर सनीच्या नावाची डिंपल कपाडियासोबत सर्वात जास्त चर्चा झाली. दोघांच्यात आजही मैत्रीचे नाते असल्याचे बोलले जाते. दोघांनी ‘नरसिंम्हा’, ‘गुनाह’, ‘मंजिल’, ‘आग का गोला’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटात काम केले होते.

दरम्यान सनी आणि डिंपल दोघेही विवाहित असूनही त्यांच्यात सुरू असलेल्या संबंधामुळे सगळीकडे मोठी चर्चा रंगली होती. त्यांच्या या प्रकरणामुळे दोघांच्याही वैवाहिक जीवनावर परिणाम होत होता. इतकेच नव्हेतर डिंपलची मुलेही सनीला पप्पा म्हणून हाक मारायला लागली होती. या सगळ्या प्रकारामुळे सनी देओलच्या पत्नीने त्याला खडसावले त्यामुळेच त्यांचे हे नाते संपुष्टात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा