तर ‘या’ कारणामुळे डिंपल कपाडिया यांनी लग्नाच्या २७ वर्षांनंतरही राजेश खन्नांना नव्हता दिला घटस्फोट

बॉलिवूडमधील सर्वात गाजलेली प्रेमकहाणी म्हणजे राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया. या दोघांची प्रेमकहाणी जितकी गाजली तितकीच त्यांची जोडी देखील हिट ठरली. आजही या जोडीचे अनेक किस्से अतिशय आनंदाने ऐकले आणि वाचले जातात. जेवढी ही जोडी आणि त्यांची प्रेमकहाणी गाजली तेवढेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील तुफान गाजले. सुपरस्टार राजेश खन्ना आणि हिट अभिनेत्री डिंपल कपाडिया हे अनेक वर्ष एकत्र राहून वेगळे झाले, मात्र वेगळे होऊनही ते वेगळे झाले नव्हते. म्हणजे नक्की काय जाणून घेऊया.

राजेश खन्ना हे सुपरस्टार होते तर बॉबी सिनेमातून डिंपल यांना देखील अमाप लोकप्रियता मिळाली. राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचे लग्न आणि त्यांच्या वयातील अंतरापासूनच प्रकाशझोतात यायला लागले. जेव्हा राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी लग्न केले तेव्हा डिंपल केवळ १६ वर्षांच्या तर राजेश खन्ना ३२ वर्षांचे होते. म्हणजेच या दोघांमध्ये तब्बल १६ वर्षांचे अंतर होते. त्यांचे लग्न यामुळेच सर्वात मीडियामध्ये आणि लोकांमध्ये चर्चेत राहिले. लग्नानंतर काही महिन्यातच डिंपल आणि राजेश खन्ना यांना पहिली मुलगी ट्विंकल खन्ना झाली. त्यानंतर लगेचच त्यांना रिंकी खन्ना ही दुसरी मुलगी झाली.

rajesh khanna and dimpal kapadia
rajesh khanna and dimpal kapadia

लग्नानंतर डिंपल यांनी चित्रपटांना रामराम ठोकला. पुढे त्या संसारात आणि मुलींच्या संगोपनात व्यस्त झाल्या. मात्र दोन मुलींच्या जन्मानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्यात दुरावा निर्माण होण्यास सुरुवात झाली. डिंपल यांना चित्रपटांमध्ये पुन्हा काम करायचे होते, मात्र राजेश यांचा याला नकार होता. याच कारणामुळे दोघांमध्ये दुरावा आला. लग्नानंतर तब्बल ११ वर्ष डिंपल चित्रपटांपासून लांब होत्या.

राजेश खन्ना आणि डिंपल यांच्यात वाढत जाणाऱ्या वादांमुळे डिंपल यांनी त्यांचे घर सोडले आणि वेगळ्या राहू लागल्या. यानंतर त्यांनी पुन्हा चित्रपटांमध्ये कमबॅक केले. यादरम्यानच त्यांच्या आयुष्यात सनी देओल यांची एंट्री झाली. एका माहितीनुसार सनी आणि डिंपल हे एकमेकांच्या जवळ आले आणि एकमेकांना पसंत करू लागले. डिंपल यांची इच्छा होती की, सनी यांनी त्यांच्याशी लग्न करावे, मात्र सनी आधीच विवाहित होते आणि त्यांना त्यांच्या पत्नीला घटस्फोट दयायचा नव्हता. याच गोष्टीचा डिंपल यांना राग आला आणि त्यांनी देखील राजेश खन्ना यांना घटस्फोट दिला नाही.

डिंपल यांची राजेश खन्ना यांच्या आयुष्यात तेव्हा पुन्हा एन्ट्री झाली जेव्हा राजेश खन्ना कॅन्सरने ग्रस्त झाले. राजेश खन्ना यांच्याकडे अजिबात जास्त वेळ नव्हता. तेव्हा २७ वर्षांनी हे एकत्र आले आणि त्यांचे नाते देखील सुधारले. मात्र त्यांनतर लगेचच २०१२ साली राजेश खन्ना यांचे निधन झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post