चाहत्यांच्या मनावर राज्य करत भोजपुरी इंडस्ट्री सर्वच विक्रम मोडते आहे. अनेक मादक अभिनेत्री भोजपुरी चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. या अभिनेत्री त्यांच्या अभिनयाने आणि हॉट लूकमुळे नेहमी चर्चेत असतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलेल्या सनी लिओनीचाही वेगळाच दबदबा आहे. तिने अनेक हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे. काही दिवसांपासून सनी भोजपुरी चित्रपटांमध्ये देखील झळकू लागली आहे. काय झालात ना चकित? हो सनीच, पण ही ती सनी नाही, जिचा तुम्ही विचार करत आहात. ही आहे सनी सिंग.
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, सनी सिंग अगदी हुबेहूब सनी लिओनी सारखीच दिसते. तोच चेहरा, तेच मृगनयनी डोळे आणि तसाच बांधा. सनी सिंग ही भोजपुरी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांना सध्या चकित करत आहे. अनेकांना ती सनी लिओनी असल्याचे वाटते. तिचे खरे नाव पल्लवी आहे. तिने साल २०१२ मध्ये पहिल्यांदा सनी लिओनीला टीव्हीवर पाहिले होते. सनीचा चेहरा आपल्या सारखाच दिसतो असं समजल्यावर तिने स्वतःचे नाव बदलून सनी सिंग असे ठेवले होते.
सनी लिओनीची नक्कल करण्याची ती एकही संधी सोडत नाही. सनीची प्रत्येक स्टाईल हुबेहूब कॉपी करण्याचा ती प्रयत्न करते. तसेच तिच्यासारखे कपडे आणि मेकअप करून हुबेहूब लूक तयार करते. भोजपुरी चित्रपट हे बहुदा यूट्यूब आणि सोशल मीडियावरच प्रदर्शित होत असतात. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सनी सिंगचीच चर्चा सुरू आहे.
भोजपुरी चित्रपट आणि गाण्यांमध्ये आघाडीवर असलेल्या आम्रपाली दुबे, अक्षरा सिंग आणि मोनालिसा या अभिनेत्रींना देखील ती आता मागे टाकत पुढे चालली आहे. सोशल मीडियावर तिचे सनी लिओनीच्या वेशातील अनेक इंस्टाग्राम रील्स, व्हिडिओ आणि फोटो खूप व्हायरल होत आहेत. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमी उत्सुक असतात. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक भोजपुरी गाण्यांमध्ये डान्स आणि अभिनय केलेला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सहनशीलता आपल्याला स्ट्रॉंग बनवते’, म्हणत रिकव्हर होणाऱ्या शिल्पाने शेअर केली पोस्ट
-सोनम कपूरच्या आयुष्यात ‘Someone special’ची एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘तयार व्हा’