‘जैसा देस वैसा भेस’ अशी आपल्याकडे म्हण आहे. अगदी या म्हणीप्रमाणेच कलाकार देखील चित्रपटांमध्ये काम करत असताना, त्यांच्या भूमिकांनुसार स्वतःवर वेगवेगळे मेकअप, वेगवेगळ्या वेशभूषा, वेगवेगळी बोली भाषा आत्मसाद करतात. त्यांची भूमिका अगदी खरी वाटून प्रेक्षक त्या भूमिकेसोबत लवकर जोडले जावे हाच या मागचा हेतू असतो. अभिनेत्री सनी लियोनीने देखील नुकताच तिचा असाच काहीसा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सनीदेखील समाविष्ट आहे. सनी अगदी रोज तिचे तिच्या सिनेमाच्या सेटवरील व्हिडिओ, फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. सध्या सनी तिच्या पहिल्या वहिल्या तामिळ सिनेमा असलेल्या ‘शिरो’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या सेटवरील अनेक व्हिडिओ तिने आतापर्यंत शेअर केले आहेत. (sunny leone video with injuries on her face)
सनीने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिला चेहऱ्यावर मार लागल्याचे आपल्याला दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा देखील दिसत आहे. हा व्हिडिओ पहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की तिचा हा व्हिडिओ सेटवरील आहे आणि तिला चेहऱ्यावर काही लागले नसून, तो मेकअप केला आहे. या व्हिडिओमध्ये सनी तिच्या टीमसोबत भरपूर मस्ती करताना दिसत आहे. तिने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “जेव्हा तुम्ही काम करता आणि इतर लोकं जेवण करत असतात.”
सनीने अजून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, या व्हिडिओमध्ये ती तिच्या मेकअपमधेच डोसे खाताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, “तुम्ही सांगू शकता का, की मी किती डोसे खाल्ले आहेत?” तिचे हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून, यावर तिचे फॅन्स देखील कमेंट्स करताना दिसत आहेत.
मागील बऱ्याच काळापासून सनी तिच्या तामिळ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या सिनेमातील तिचा फर्स्ट लूकदेखील तिने शेअर केला. या फर्स्ट लूकमध्ये आपल्याला सनीचा आजवर कधीही न पाहिलेला लूक आणि अंदाज दिसत आहे. या लूकमध्ये तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर जखमा, तेज आणि रागीट नजर पाहायला मिळत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–सुपर्ब! मराठमोळ्या अनुजा साठेचा वर्कआऊट पाहून तुम्हीही व्हाल थक्क; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल