कलाकार आणि फॅन्स यांचे नाते खूपच अनोखे आहे. फॅन्सच असतात ज्यांच्यामुळे कलाकरांना लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळते. हे फॅन्स कलाकारांना अमाप प्रेम देतात. त्यांचे कलाकारांबद्दल असलेले प्रेम दाखवण्याची पद्धत नेहमीच हटके असते. कलाकार देखील फॅन्सचे प्रेम बघून अनेकदा भावनिक होतात. जेव्हा कलाकरांचे त्यांच्या कामाबद्दल प्रेक्षकांकडून कौतुक केले जाते, तेव्हा तर त्यांना त्यांच्या भावना अनावर होताना आपण अनेकदा पाहिले असेल. असाच एक भावनिक प्रसंग नुकताच टीव्हीवर पाहायला मिळाला.
टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रियॅलिटी डान्स शो म्हणजे ‘सुपर डान्सर ४’ होय. या आठवड्यात या शोमध्ये करिश्मा कपूर परीक्षकाच्या भूमिकेत दिसली. त्यामुळे हा आठवडा शोमध्ये करिश्मा कपूर स्पेशल म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी सर्व स्पर्धकांनी करिश्मा कपूरच्या हिट गाण्यांवर धमाकेदार डान्स केला. या शोमध्ये करिश्मा शिल्पा शेट्टीच्या जागेवर दिसून आली. यावेळी करिश्माने सर्व स्पर्धकांना प्रेरित केले आणि खूप मजा देखील केली. (Super Dancer chapter 4 karisma kapoor gets emotional)
या सर्व परफॉर्मन्समध्ये एक परफॉर्मन्स असा आला की, करिश्मा भावनिक झाली आणि तिचे डोळे भरून आले. पृथ्वीराज या स्पर्धकाने करिश्माच्या ‘अनाडी’ सिनेमातील ‘फुलो सा चेहरा तेरा’ या गाण्यावर खूपच अप्रितम डान्स केला. या डान्स सादरीकरणाचे विशेष आकर्षण होते, ते म्हणजे डान्स चालू असताना मागे करिश्माचे सर्व जुने आणि निवडक फोटो स्क्रीनवर दाखवले जात होते. हे फोटो पाहून करिश्माला तिच्या जुन्या दिवसांची आठवण झाली आणि ती भावुक झाली. सोबतच डान्समध्ये तिच्या आयुष्याचे वेगवेगळे टप्पे खूपच हटके ढंगात धाखवले गेले. परफॉर्मन्स झाल्यावर ती म्हणाली, ‘मी खूपच भावुक झाली असून, हे माझ्यासाठी खूपच खास आहे, धन्यवाद.’
याभागात करिश्माने तिच्या कुटुंबातील, तिच्या करिअरच्या बाबतीतील अनेक आठवणी सर्वांना सांगितल्या. विशेष म्हणजे करिश्माने या शोच्या मंचावरून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तिच्या आयुष्यातील सर्व गुरूंना आणि नृत्यदिग्दर्शकांना धन्यवादही म्हटले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कलाकारांपेक्षाही अधिक लाइमलाइटमध्ये आहेत त्यांची मुलं; जाणून घ्या ‘या’ स्टारकिड्सबद्दल
-मोठी बातमी! ‘बिग बॉस’ फेम यशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा जागीच झाला मृत्यू
-सोनम कपूरच्या घरी आला नवीन चिमुकला पाहुणा; फोटो शेअर करून अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी