Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड ‘सुपर डान्सर’च्या सेटवर फराह खानसोबत शिल्पा शेट्टी करत होती भन्नाट डान्स; पण मध्येच झाली ‘ही’ गडबड

‘सुपर डान्सर’च्या सेटवर फराह खानसोबत शिल्पा शेट्टी करत होती भन्नाट डान्स; पण मध्येच झाली ‘ही’ गडबड

‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ शोच्या सेटवर अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा परतली आहे. तेव्हापासून शोच्या सेडवर अगदी जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर नुकताच झालेला एपिसोड मोठ्या दणक्यात पार पडला. या एपिसोडमध्ये धमला आणि मस्ती पाहायला मिळाली आहे. ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ शोचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडिओ फराह खानने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि फराह खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

शिल्पा शेट्टी, गीता कपूर तसेच फराह खान खूप मज्जेशी डान्स करताना दिसल्या आहेत. तसेच त्यावेळी फराह शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. फराह ज्या रियॅलिटी शोमध्ये जाते, तिथे ती खूप मज्जा करताना दिसते. दरम्यान ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मध्येही असेच घडले आहे. फराह शोमध्ये आली आणि बाकीच्या जजसोबत मजेदार डान्स करायला सूरूवात केली. पण डान्स चालू असतानाच शोच्या होस्ट, ज्याला प्रेमाने ‘मामा’ म्हटले जाते तो मध्ये आला. त्यामुळे सगळी गडबड झाली.

शिल्पाने गेल्या ३ आठवड्यांपूर्वी ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ मध्ये पुनरागमन केले आहे. पती राज कुंद्राच्या अटकेनंतर ती केवळ माध्यमांपासून नव्हे, तर तिच्या व्यावसायिक आयुष्यापासूनही लांब झाली होती. पण आता तिने कामावर परतण्याचा निर्णय घेतला आणि आता ती ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये दिसत आहे. ती पुन्हा सोशल मीडियावर देखील सक्रिय झाली आहे.

दरम्यान,  शिल्पा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वेगवेगळ्या ड्रेसेमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.  शिल्पा ट्रेंडनुसार स्वत:ला बदलते. नुकत्याच शिल्पाने एक स्टायलिश फोटो शेअर केला आहे, ज्यात ती अतिशय अनोख्या वेशभूषेत दिसत आहे. सोनेरी रंगाचा हा ड्रेस तिच्यावर खूपच खुलून दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत शिल्पाने “सोनेरी क्षण” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. शिल्पा या फोटोत प्रचंड सुंदर दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

हे देखील वाचा