Friday, June 14, 2024

एकेकाळी ‘या’ हिट चित्रपटांना काजोलने दिला होता नकार, आज नक्कीच होत असेल पश्चाताप

आपल्या आयुष्यात आपण चुकून का होईना, पण काही ना काही चूक करत असतो. अशा परिस्थितीत आपले बॉलिवूड सेलिब्रिटीही काही वेगळे नाहीत. मोठ्या टीमसोबत मोठमोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करणारे हे स्टार्स अनेक वेळा असे मोठे प्रोजेक्ट करण्यास नकार देतात, जे नंतर सुपरहिट ठरतात. अशीच चूक काजोलसोबतही (Kajol) अनेकदा झाली आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत काजोलने अशा अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. चला त्या हिट चित्रपटांबद्दल बोलूया, ज्यांच्या ऑफर काजोलने नाकारल्या होत्या.

वीर झारा
काजोल आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) या सुपरहिट जोडीचे यश कुणापासून लपलेले नाही. जेव्हा-जेव्हा काजोल आणि शाहरुख पडद्यावर एकत्र दिसले, तेव्हा चित्रपटगृहांसमोर प्रेक्षकांची ओढ लागलेली पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत यश चोप्रांना काजोल आणि शाहरुखची जोडी ‘वीर-झारा’साठी हवी होती, पण काजोलने त्यांची ऑफर धुडकावून लावली. त्यानंतर यश चोप्राच्या मनात प्रीती झिंटाचे नाव आले आणि हा चित्रपट नंतर खूप हिट ठरला. (superhit bollywood movies rejected by kajol veer zara kabhi alvida na kehna 3 idiots mohabbatein)

मोहोब्बतें
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात काजोलला पहिल्यांदा शाहरुख खानसोबत कास्ट करण्यात आले होते. पण जेव्हा काजोलने ही भूमिका नाकारली, तेव्हा ही भूमिका ऐश्वर्या रायच्या (Aishwarya Rai) झोळीत पडली.

३ इडियट्स
राजकुमार हिरानीच्या ‘3 इडियट्स’मध्ये करीना कपूरने (Kareena Kapoor) साकारलेली भूमिका पहिल्यांदा काजोलला ऑफर झाली होती. पण काही कारणास्तव हे होऊ शकले नाही आणि निर्मात्यांनी प्रियाच्या भूमिकेसाठी करीनाला कास्ट केले.

कभी अलविदा ना कहना
राणी मुखर्जी (Rani Mukerji) आणि शाहरुख खान यांच्या ‘कभी अलविदा ना कहना’ या सुपरहिट चित्रपटात ही भूमिका पहिल्यांदा काजोलला आली होती. मात्र काजोलने ही ऑफर नाकारली होती.

अधिक वाचा-
जेव्हा काजोलने मुलांसह घर सोडण्याचा घेतला होता निर्णय, अशाप्रकारे अजय देवगणने केली होती मनभरणी
खरंच की काय! ‘या’ कारणामुळे रितेश देशमुख लग्नात आठवेळा पडला होता पत्नी जेनेलियाच्या पाया

हे देखील वाचा