Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड ‘आम्ही तुमच्यामुळेच…’, Kargil Vijay Diwasच्या निमित्ताने अक्षय कुमारने काढली शूरवीरांची आठवण

‘आम्ही तुमच्यामुळेच…’, Kargil Vijay Diwasच्या निमित्ताने अक्षय कुमारने काढली शूरवीरांची आठवण

दरवर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी कारगिल युद्धातील शहीद भारतीय सैनिकांचे बलिदान आणि शौर्याची आठवण काढली जाते. अशात या दिवशी बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार याने शूरवीर जवानांची आठवण काढत सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

भारतीय सैनिकांसाठी 26 जुलै हा गौरवाचा दिवस आहे. याच दिवशी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला धूळ चारत विजयी तिरंगा फडकावला होता. या विजयाला आज 24 वर्षे पूर्ण झाले आहेत.

‘आम्ही तुमच्यामुळेच जगत आहोत’
कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) साजरा करत अक्षय कुमार (Akshay Kumar) याने जवानांचा फोटो शेअर करत खास कॅप्शन दिले आहे. त्याने ट्विटरवर लिहिले की, “हौतात्म्य पत्करलेल्या आपल्या शूरवीरांचे स्मरण, हृदयात कृतज्ञता आणि ओठांवर प्रार्थना. आम्ही तुमच्यामुळेच जगत आहोत.”

चाहते काय म्हणाले?
अक्षय कुमार याच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मणिपूर घटनेचा उल्लेखही केला आहे. एकाने लिहिले की, “सर तुम्ही सर्व जवानांसाठी जो उल्लेख करत आहात, ती खूप मोठी गोष्ट आहे. कोणाच्या आयुष्यात रंग भरणे तुमच्याकडून शिकावे. तुम्ही भारताचा गौरव आहात सर, सर्व कारगिल जवानांना नमन. जय हिंद.”

आणखी एकाने संताप व्यक्त करत लिहिले की, “26 जुलै, आज कारगिल दिवस आहे, पण कारगिल योद्ध्याच्या पत्नीची मणिपूरमध्ये नग्न धिंड काढण्यात आली, यापेक्षा दुर्दैवी काय असू शकते. मोदींनाही आणि तुलाही लाज वाटली पाहिजे अक्षय.”

अक्षय कुमारचा आगामी सिनेमा
अक्षय कुमार याच्या आगामी सिनेमाविषयी बोलायचं झालं, तर तो ‘ओएमजी 2’ या आगामी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा पुढील महिन्यात 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमात अक्षयव्यतिरिक्त अरुण गोविल, यामी गौतम, पंकज त्रिपाठी, गोविंद नामदेव यांसारख्या कलाकारांचाही समावेश आहे. (superstar akshay kumar tribute to martyrs remember sacrifice of soldiers on kargil vijay diwas)

महत्त्वाच्या बातम्या-
‘मी बहिरी नाहीये…’ म्हणत जया बच्चन यांची पापाराझींवर आगपाखड, नेटकरी म्हणाले, ‘म्हणून आमचे रेखावर प्रेम’
“कलाकाराने कसे असायला पाहिजे हे…” जयंत सावरकरांच्या आठवणींना उजाळा देताना ‘या’ कलाकाराने केले त्यांचे कौतुक

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा