Monday, October 2, 2023

‘मी बहिरी नाहीये…’ म्हणत जया बच्चन यांची पापाराझींवर आगपाखड, नेटकरी म्हणाले, ‘म्हणून आमचे रेखावर प्रेम’

साठ आणि सत्तरचे दशक गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्रींमध्ये जया बच्चन यांच्या नावाचाही समावेश होतो. जया नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असतात. जया आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनल्या आहेत. त्यांचे चर्चेत येण्यामागील कारण त्यांचा राग ठरला. जया आपल्या मुलांसोबत म्हणजेच अभिषेक बच्चन आणि श्वेता नंदा यांच्यासोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचल्या होत्या. याच वेळी जया बच्चन पापाराझींवर भडकल्या. यादरम्यानचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.

खरं तर, जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या रागाविषयी फक्त बच्चन कुटुंबीयच नाही, तर चाहत्यांनाही समजले आहे. जेव्हाही त्यांचा राग अनावर होतो, तेव्हा त्या आपला राग व्यक्त केल्याशिवाय राहत नाहीत. नुकतेच पापाराझींना त्यांचे नाव घेऊन ओरडण्याचे परिणाम भोगावे लागले. पापाराझींनी त्यांचे नाव जोरात पुकारताच त्यांनी आपल्या अंदाजात त्यांना झापले. आता हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधत आहे.

खरं तर, मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि मुलगी श्वेतासोबत जया ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमाच्या स्क्रीनिंगसाठी शानदार ड्रेसमध्ये पोहोचल्या होत्या. यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत होत्या. यावेळी त्या जशा वेन्यूमध्ये प्रवेश करतात, तेव्हा अभिषेक आणि श्वेतासाठी जरा वेळ थांबतात. याचदरम्यान फोटोग्राफर्स त्यांचा फोटो काढण्यासाठी त्यांचे नाव पुकारतात. सतत आवाज ऐकल्यानंतर जया यांना राग अनावर होतो आणि त्या हातवारे करत म्हणतात की, “मी बहिरी नाहीये. ओरडू नका. आरामात बोला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी त्यांना शाळेतील मुख्याध्यापिका म्हणत आहे, तर कुणी म्हणत आहे की, “या महिलेकडे पापाराझींसाठी जराही प्रेम नाहीये.” आणखी एकाने लिहिले की, “त्यामुळेच आम्ही रेखावर प्रेम करतो. त्यांच्यात कोणताही अहंकार नाहीये आणि कोणता ऍटिट्यूडही नाहीये.”

खरं तर, जया बच्चन ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या आगामी सिनेमात झळकणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत रणवीर सिंग, आलिया भट्ट, शबाना आझमी आणि धर्मेंद्र अशी दिग्गज स्टार कास्टही असणार आहे. करण जोहरचा हा सिनेमा येत्या 28 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. (actress jaya bachchan again scolds photographers for shouting at rocky aur rani kii prem kahaani screening read here)

महत्त्वाच्या बातम्या-
“कलाकाराने कसे असायला पाहिजे हे…” जयंत सावरकरांच्या आठवणींना उजाळा देताना ‘या’ कलाकाराने केले त्यांचे कौतुक
“आपल्याच देशातील लोकांचा द्वेष” फॅन्ड्री फेम राजेश्वरी खरातची ओपेनहायमरच्या ‘त्या’ सीनवर प्रतिक्रिया

हे देखील वाचा