Thursday, September 28, 2023

मणिपूरमध्ये हिंसाचार थांबेना! अत्याचाराचा व्हिडीओ पाहून अक्षय कुमार म्हणाला, ‘असे भयंकर कृत्य…’

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दोन महिलांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा मणिपूरमधल्या दोन महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओ आहे. मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात या दोन महिला अत्याचाराला बळी पडल्या होत्या. ही घटना 4 मे रोजी घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर अनेक सेलिब्रेटींनी संताप व्यक्त केला आहे. तो व्हिडिओ पाहून अभिनेता अक्षय कुमारने देखील ट्विट केले आहे.

ट्विट करताना अक्षयने ( Akshay Kumar) लिहिले की, “मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून मी खूप हादरलो आहे. दोषींना एवढी कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणीही असे भयंकर कृत्य करण्याचा विचार मनातही आणणार नाही, अशी मी आशा करतो,” असे म्हणत त्याने गुन्हेगारांना शिक्षा करण्याची मागणी केली आहे.या घटनेबाबत आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

हा व्हीडिओ समोर आल्यापासून केंद्र सरकार आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या जात आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, या महिलांना जमावासमोर नग्नावस्थेत फिरण्यास भाग पाडले. तरुणीवर सार्वजनिक ठिकाणी सामूहिक बलात्कारा केल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे.

या प्रकरणी अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर म्हणाली, “मणिपूर हिंसाचाराचा व्हिडिओ पाहून मी भयभीत झाले, मे महिन्यात घडलेली हिंसाचार आणि कोणतीही कारवाई झाली नाही. लाज वाटावी अशा लोकांना जे सत्तेच्या नशेत उंच घोड्यांवर बसले आहेत. सेलिब्रिटी गप्प आहेत. प्रिय भारतीयांनो, आपण इथे कधी पोहोचलो?” हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. (Actor Akshay Kumar was outraged after seeing a video of violence against women in Manipur)

अधिक वाचा- 
दुःखद! मनोरंजनविश्वातील ‘या’ प्रसिद्ध पटकथा लेखकाचे दुःखद निधन
‘मी हार मानणार नाही…’ म्हणत मानसीने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ; युजर म्हणाले, ‘तुझी साडी…’

हे देखील वाचा