सुपरस्टार धनुषचा अमेरिकेत जलवा; न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकले अभिनेत्याच्या चित्रपटाचे पोस्टर


दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार धनुष हा आपल्या चित्रपटांमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत असतो. नुकताच त्याचा ‘जगमे थंडीरम’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात धनुष एका गँगस्टरची भूमिका निभावत आहे. या चित्रपटात अनेक ऍक्शन सीन दाखवले आहेत. याबाबत अनेक रिव्ह्यू आले आहेत. माध्यमांमध्येही हा चित्रपट फ्लॉप आहे, असे सांगितले आहे. असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाच्या कहाणीमध्ये काही खास नसून चित्रपटाची एडिटिंग देखील चांगली नाही.

हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी धनुषची भूमिका सोशल मीडियावर खूप आवडली होती. पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याची ही भूमिका अनेकांना आवडली नाही. अशातच या चित्रपटाच्या निर्मात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाचे पोस्टर अमेरिकेमधील टाईम्स स्क्वेअरमधील बिलबोर्डवर झळकले आहे. (Superstar Dhanush movie poster display on billboard in times of square in america)

‘जगमे थंडरम’ या चित्रपटात धनुषने सुरिली नावाच्या एका गँगस्टरची भूमिका निभावली आहे. या चित्रपटात त्याला एका कामासाठी लंडनला पाठवले होते. तिथे जाऊन तो अडचणीत पडतो. परंतु लंडनपासून दूर असलेल्या न्यूयार्कमधील टाईम्स स्क्वेअरमध्ये या चित्रपटाला मोठे यश मिळाले आहे. इथे धनुषच्या चित्रपटाचे पोस्टर बिलबोर्डवर दाखवण्यात आले आहे. या बिलबोर्डवरील खास फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

धनुषचा इंग्लिश चित्रपट ‘द ग्रे मॅन’चे दिग्दर्शक रुसो ब्रदर्सने देखील त्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी या चित्रपटाबाबत एक ट्वीट केले होते. या चित्रपटात धनुषसोबत गेम ऑफ थ्रोन्सचे जेम्स कॉस्मो, जोजु जॉर्ज, ऐश्वर्या लक्ष्मी, दीपक पारमेश सारखे कलाकार आहेत. संतोष नारायण यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा

-‘बापमाणूस!’, ‘पितृदिना’निमित्त सिद्धूची खास पोस्ट आली समोर; होतोय प्रेमाचा वर्षाव

-‘फादर्स डे’च्या निमित्ताने जॅस्मिन भसीनने आई वडिलांसाठी प्लॅन केले खास गिफ्ट; लवकरच देणार ‘हे’ सरप्राईज


Leave A Reply

Your email address will not be published.