Tuesday, July 9, 2024

धक्कादायक! ‘रोबोट’चे दिग्दर्शक शंकर यांच्या जावयाविरुद्ध एफआयआर दाखल; १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप

सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि त्यांचे नातेवाईक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकतात. यामुळे माध्यमांत त्यांची जोरदार चर्चा सुरू असते. आताही असेच काहीसे झाले आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या ‘रोबोट २’चे दिग्दर्शन करणारे एस. शंकर यांचा जावई रोहित दामोदरन संकटात सापडला आहे. रोहितविरुद्ध पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. व्यावसायाने क्रिकेटपटू असलेल्या रोहितसह इतर ५ जणांवर १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप आहे.

रोहितविरुद्ध १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराशी संबंधित मेट्टूपालयम पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, पीडित मुलीने आपल्याविरुद्ध झालेल्या गुन्ह्याविरुद्ध आवाज उठवत सर्वप्रथम तमिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये मदुराई पँथर्स क्रिकेट संघाचे प्रशिक्षक थमराइकन्ननविरुद्ध व्यवस्थापनासमोर तक्रार दाखल केली होती. (Superstar Rajinikanth Starrer Robot 2 Director Shankar Son In Law Rohit Damodaran Booked For Sexual Assualt Minor Girl)

रोहितसह ५ लोकांविरुद्ध तक्रार दाखल
जेव्हा आरोपीविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तेव्हा पीडित मुलीने पुद्दुचेरी बाल कल्याण समितीकडे (पीसीडब्लूसी) धाव घेतली. तिच्या तक्रारीनंतर पीसीडब्लूसीने मेट्टुपालयम पोलीस स्टेशनमध्ये प्रशिक्षक थमराइकन्नन आणि जयकुमार, मदुराई पँथर्स क्रिकेट क्लबचे अध्यक्ष दामोदरन आणि त्यांचा मुलगा रोहित दामोदरन तसेच सचिव वेंकट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पीडितेच्या तक्रारीनुसार, तिच्यासोबत लैंगिक अत्याचाराची घटना त्यावेळी घडली, जेव्हा ती क्रिकेट प्रशिक्षणासाठी क्रिकेट क्लबमध्ये गेली होती. सध्या पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक केली नाहीये. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच ते या प्रकरणात रोहित दामोदरनचा समावेश होता की नाही, याचा शोध घेत आहेत.

एमके स्टालिनही झाले होते रोहित आणि ऐश्वर्याच्या लग्नात सामील
रोहित हा एक क्रिकेटपटू आहे. त्याचे वडील दामोदरन हे उद्योगपती तसेच तमिळनाडू प्रीमियर लीग संघ मदुराई पँथर्स क्रिकेट संघाचे मालक आहेत. रोहितचे लग्न याचवर्षी २७ जून रोजी दिग्दर्शक एस. शंकर यांची मुलगी ऐश्वर्यासोबत झाले होते. या लग्नाचे आयोजन महाबलीपुरममध्ये झाले होते. हे एक खासगी लग्न होते, ज्यामध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील काही व्यक्तीही सामील झाले होते. विशेष म्हणजे या लग्नामध्ये तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिनही आपला मुलगा उदयनिधी स्टालिनसोबत या लग्नात पोहोचले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यन खानला पुन्हा झटका! ‘या’ तारखेपर्यंत राहणार जेलमध्येच, तर व्हॉट्सऍप चॅट्समुळे वाढू शकतात समस्या

-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स

-ब्रेकिंग! आर्यन खान प्रकरण आणखी खोलात, शाहरुखच्या ‘मन्नत’वर पडली रेड

हे देखील वाचा