पुढील वर्ष सुरू होण्यासाठी आता फक्त काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. 25 जानेवारी रोजी शाहरुख खान याचा ‘पठाण‘ हा सिनेमा रिलीज होणार आहे. मात्र, या सिनेमामुळे सुरू झालेला वाद आता थांबायचं नाव घेत नाहीये. अनेक राज्यांमध्ये या सिनेमावर बंदी घातली जाण्याची चर्चा आहे. जवळपास 4 वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत असलेल्या शाहरुखच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. अशात शाहरुखने त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान वेदना जाहीर केल्या आहेत. त्याने सांगितले आहे की, पराभवाचा सामना करणे खूपच कठीण असते.
शाहरुख खान (Shahrukh Khan) याने यादरम्यान सांगितले की, “2014मध्ये अबू धाबीत आमचा कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघ सर्व सामने हारत होता. मला आठवते, मी मुलांसोबतच बसायचो. आम्ही हॉटेलच्या रूममध्ये लहान बाळांसारखे रडायचो. तसेच, म्हणायचो की, ‘अरे यार, हे पुन्हा हारले. खूप वाईट वाटत होते.'”
विशेष म्हणजे, शाहरुखसोबत सुहाना खान (Suhana Khan) आणि आर्यन खान (Aryan Khan) हेदेखील खोलीत रडले होते.
View this post on Instagram
प्रश्नांची दिली मजेशीर उत्तरे
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा रिलीज होण्यासाठी फक्त 1 महिन्याचा कालावधी बाकी आहे. मात्र, सोशल मीडियावर सिनेमाविषयी जोरदार चर्चा सुरू आहेत. विरोध होत असतानाही शाहरुख सातत्याने सिनेमाचे प्रमोशन करत आहे. शाहरुखने नुकतेच प्रमोशनदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
View this post on Instagram
त्याला विचारण्यात आले की, जर तुझा सिनेमा फ्लॉप झाला, तर तू अभिनय सोडशील का? तसेच, असेही विचारले की, जर तू अभिनय सोडला, तर त्याजागी काय करशील? यावर शाहरुखने मजेशीर अंदाजात म्हटले की, “मी अभिनय सोडला, तर पठाण केटरिंग सुरू करेल. मी बाजीगर बेकरीही सुरू करू शकतो. तसेच, मिठाईच्या दुकानातही मला खास रस आहे.”
‘पठाण’ सिनेमातील कलाकारांविषयी बोलायचं झालं, तर या सिनेमात शाहरुखव्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा जवळपास 250 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. अशात आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (superstar shahrukh khan shares his emotional breakdown as his team loses match cried bitterly like baby)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नम्रता शिरोडकरचा लग्नाच्या 17 वर्षांनंतर केला खुलासा; सांगूनच टाकले, का सोडावी लागली इंडस्ट्री
संतापजनक! घरभाड्याच्या बदल्यात नगरसेवकाने तेजस्विनीकडे केलेली घाणेरडी मागणी, अभिनेत्रीने पुढे…