Thursday, March 28, 2024

‘मी हिंदू असतो किंवा माझे नाव…’, ‘पठाण’च्या वादात शाहरुखचा जुना व्हिडिओ आला समोर, सर्वत्र व्हायरल

बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे होऊन गेले आणि आहेत, जे रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्यामध्ये शाहरुख खान याच्या ‘पठाण‘ या सिनेमाचाही समावेश होतो. या सिनेमातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून वादाला तोंड फुटले आहे. शाहरुख आणि दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यावर अश्लीलता पसरवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. धार्मिक संघटनांनी ‘पठाण’ सिनेमा बॉयकॉट करण्यासही सुरुवात केली. असे सर्व सुरू असतानाच शाहरुखचा धर्माविषयीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शाहरुख जर हिंदू असता तर…
शाहरुख खान (Shahrukh Khan) याने एका जुन्या मुलाखतीत याबाबत भाष्य केले होते. त्याला विचारण्यात आले होते की, जर तो हिंदू असता किंवा त्याचे नाव इतर काही असते, तर कोणत्या गोष्टी त्याच्यासाठी वेगळ्या असत्या? त्याला अशी विचारणा करण्यात आली होती की, “तू चांगला मुस्लिम आहेस. मात्र, जर तुझे नाव एसकेवरून शेखर कृष्ण असते तर…” यावर शाहरुख बोलतो की, “शेखर कृष्ण नाही… एसआरके म्हणजेच शेखर राधा कृष्ण.” यानंतर शाहरुखने त्याच्या उत्तराने सर्वांचीच मने जिंकली.

यावेळी शाहरुख म्हणाला होता की, जर तो हिंदू असता किंवा त्याचे नाव शेखर राधा कृष्ण असते, तरीही तो असाच असता. तसेच, त्याच्यासाठी सर्व गोष्टी आतासारख्याच असत्या. तो म्हणालेला, “वेगळे काही असते, असं मला वाटत नाही. माझ्या मते, कलाकारात अशी गोष्ट असते की, ते कोणत्या समुदायातून आणि कोणत्या क्षेत्रातून आले आहेत, याचा फरक पडत नाही. एकतर तुम्हाला त्यांची कला आवडते किंवा आवडत नाही. तुम्ही मला कोणत्याही नावाने पुकारले असते, तरीही मी इतकाच स्वीट असतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Faridoon Shahryar (@ifaridoon)

शाहरुखचे उत्तर मन जिंकणारे
शाहरुखने इतक्या चांगल्याप्रकारे हे उत्तर दिले की, त्यामुळे त्याने सर्वांचीच मने जिंकली. अशात या वादादरम्यान शाहरुखचे जुने चर्चेत आहे. शाहरुखचा हा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

‘पठाण’ या सिनेमाविषयी बोलायचं झालं, हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 25 जानेवारी, 2023 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. हा सिनेमा बनवण्यासाठी जवळपास 250 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या सिनेमाच्या रिलीजपूर्वीच वाद उफाळल्याने रिलीजनंतर हा सिनेमा कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. (amid pathaan controversy superstar shah rukh khan old video over religion goes viral read here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पठाण’ चित्रपटाच्या वादामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ची मध्येच उडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण
तेरा घर चला जाएगा! बिग बॉसच्या घरामध्ये गली बॉयने केला पुन्हा एकदा राडा

हे देखील वाचा