Thursday, November 30, 2023

संतापजनक! घरभाड्याच्या बदल्यात नगरसेवकाने तेजस्विनीकडे केलेली घाणेरडी मागणी, अभिनेत्रीने पुढे…

कलाविश्वात अनेक अभिनेत्री आहेत, ज्या सुरुवातीच्या काळात संघर्ष करून नाव कमावण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, यादरम्यान त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधीकधी अशा घटना घडतात, ज्याने अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. असेच काहीसे मराठी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्यासोबत घडले होते. तेजस्विनीने नुकताच तिच्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. तिच्या या खुलाशानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने धक्कादायक खुलासा करत सांगितले आहे की, एकदा विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील नगरसेवकाने तिच्याकडे घरभाड्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली होती. ही वेदनादायक आपबीती सांगताना तेजस्विनी असेही म्हणाली की, त्यादरम्यान तिची आर्थिक परिस्थिती बेताची होती.

काय म्हणाली तेजस्विनी?
तेजस्विनीने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा करत सांगितले की, “ही गोष्ट जवळपास 2009-10ची आहे. मी त्यावेळी पुण्याच्या सिंहगड रोडवरील एका भाड्याच्या घरात राहायचे. मी अभिनेत्री असल्याचे घरमालकाला माहिती होते. त्याला हेदेखील माहिती होते की, माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये.”

“त्यावेळी माझे 1-2 सिनेमे रिलीज झाले होते. मी ज्या घरात राहायचे, ते घर एका नगरसेवकाच्या मालकीचे होते. एकदा मी त्याच्या ऑफिसमध्ये घराचे भाडे देण्यासाठी गेले, तेव्हा त्याने मला घरभाड्याच्या बदल्यात घाणेरडी मागणी केली. हे ऐकल्यानंतर मला राग आला आणि मी त्याच्या टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून त्याच्या चेहऱ्यावर पाणी फेकले,” असेही तेजस्विनी पुढे म्हणाली.

यानंतर नगरसेवकाला सुनावताना तिने म्हटले की, “मी या क्षेत्रात अशा गोष्टी करण्यासाठी आले नाहीये, नाहीतर मी भाड्याच्या घरात राहिले नसते. माझ्याकडे माझे स्वत:चे घर असते आणि दारात गाड्या उभ्या केल्या असत्या.”

दोन कारणांमुळे झाले धाडस
नगरसेवकाने असे धाडस करण्यामागे दोन गोष्टी असल्याचे अभिनेत्रीने सांगितले. ती म्हणाली की, “एक म्हणजे त्याने माझ्या कामावरून तसं केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी आर्थिक स्थिती बेताची होती. मात्र, यातून मला शिकायला मिळालं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिची ‘अथांग’ ही वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिने ‘रानबाजार’ या वेबसीरिजमध्येही काम केले होते. याव्यतिरिक्त तिने ‘तू ही रे’, ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘देवा’ यांसारख्या सिनेमात काम केले आहे. (marathi actress tejaswini pandit reveals shocking incident her home owner read more)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्जुन अन् तब्बूच्या ‘कुत्ते’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, राधिका मदानच्या हॉटनेसने वेधले लक्ष; पाहा व्हिडिओ
‘संत तुकाराम महाराज माझ्याकडे 22 वेळा आले’, भलताच चर्चेत असलेल्या सुबोध भावेचं वक्तव्य

हे देखील वाचा