Thursday, June 1, 2023

‘इंडियन आयडल’ फेम पवनदीप अन् अरुणिताने गुपचूप केले लग्न? फोटो आले समोर

जर तुम्ही ‘इंडियन आयडल १२’मधील (Indian Idol) सर्वात आवडती जोडी अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal) आणि पवनदीप राजन (Pawandeep Rajan) यांना सोशल मीडियावर नववधू आणि वराच्या पोशाखात पाहिले असेल, तर तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. दोघेही अशा प्रकारे विवाहित जोडपे बनलेले पाहून, तुम्हाला आनंद आणि गोंधळ जाणवला असावा. तुम्ही विचार करत असाल की, तुम्ही जे पाहिले ते खरे आहे की भ्रम. त्यामुळे आम्ही तुमचा संभ्रम दूर करतो. चला तर मग या व्हायरल फोटोचे सत्य जाणून घेऊया.

पवनदीप-अरुणिताचे लग्न झाले का? जाणून घ्या व्हायरल फोटोचे सत्य
सोशल मीडियावर अरुणिता आणि पवनदीपच्या  फॅनक्लबवर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्याला पाहून त्यांच्या लग्नाची अटकळ बांधली जात आहे. हा फोटो पाहून काही चाहत्यांना धक्का बसला आहे. पण अनेक चाहत्यांची मने तोडणारा हा फोटो खोटा आहे असेच म्हणावे लागेल. याला एडिट केला गेला आहे. हा फोटोशॉप केलेला फोटो पाहून खूश होऊ नका, अरुणिता आणि पवनदीपचे हा फोटो फॅनमेड आहे. (indian idol fame pawandeep rajan arunita kanjilal marriage photo viral know truth)

यात अजिबात तथ्य नाही. तसेच हा फोटो त्यांच्या कोणत्याही म्युझिक व्हिडिओचा भाग नाही. या बनावट फोटोवर पवनदीप आणि अरुणिताच्या बाजूने अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

पवनदीप आणि अरुणिताचे झाले भांडण?
नुकतेच पवनदीप आणि अरुणिता यांच्यातील मतभेदाचे प्रकरण समोर आले होते. अरुणिताने पवनदीप राजनच्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्यास नकार दिल्याने हे सर्व प्रकरण समोर आले. तर यापूर्वी तिने काम करण्यास होकार दिला होता. दोघांमध्ये नेमके काय झाले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पवनदीप आणि अरुणिता यांच्यात सर्व काही ठीक असल्याच्याही बातम्या आहेत. दोघेही आजही मित्र आहेत.

अरुणिता आणि पवनदीप यांच्याबद्दल चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही. इंडियन आयडलमध्ये दोघांचा लव्ह अँगल दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र दोघांमध्ये लव्ह ट्रॅक नव्हता. ते चांगले मित्र होते. शो संपल्यानंतर अरुणिता आणि पवनदीप यांनी अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले आहे. दोघेही एकत्र कार्यक्रम करतात.

हेही वाचा-

हे देखील वाचा