Sunday, September 8, 2024
Home कॅलेंडर ‘लहानपणी भावाच्या खांद्यावर बसून यात्रेत जायचो, गाणी गायचो’, उदित यांनी जागवलेल्या बालपणीच्या आठवणी

‘लहानपणी भावाच्या खांद्यावर बसून यात्रेत जायचो, गाणी गायचो’, उदित यांनी जागवलेल्या बालपणीच्या आठवणी

क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर मोठा संघर्ष हा करावाच लागतो. याचेच एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध गायक उदित नारायण. उदित नारायण हे हिंदी चित्रपट जगतातील सर्वात लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जातात, पण हे यशाचे शिखर गाठण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. ज्याचा उल्लेख त्यांनी अलीकडेच ‘सुपरस्टार सिंगर 2’ या कार्यक्रमामध्ये केला. कार्यक्रमात त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक संघर्षमय किस्से सांगितले, जे ऐकून सगळेच थक्क झाले. गुरुवारी (1 डिसेंबर) उदित त्यांचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने जाणून घेऊया, त्यांच्या किस्स्यांबद्दल…

उदित नारायण हे नव्वदच्या दशकातील लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जातात. आपल्या जादूई आवाजाने त्यांनी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. नव्वदच्या काळात त्यांच्या रोमॅंटिक गाण्यांनी तरुणाईला वेड लावले होते. उदित नारायण यांचे हिंदी संगीत जगतासाठी दिलेले योगदान मोठे आहे. मात्र, इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला होता. ते ‘सुपरस्टार सिंगर 2’ या कार्यक्रमात सहभागी झाली होते. ज्यामध्ये त्यांनी त्यांचा संघर्ष आणि यशस्वी प्रवास सांगितला होता.

‘सुपरस्टार सिंगर 2’ या कार्यक्रमात उदित नारायण, अलका याग्निक, अनुराधा पौडवाल ही संगीत जगतातील दिग्गज त्रिमुर्ती उपस्थित होती. या दिग्गजांनी 90च्या दशकातील अनेक रंजक किस्से सांगितले. त्याचबरोबर त्यांनी अनेक गाजलेली गाणीही गायली. कार्यक्रमातील स्पर्धकांचेही जोरदार कौतुक झालेले पाहायला मिळाले. यामधील मणी नावाच्या स्पर्धकाचे सर्वांनाच कौतुक केले. या लहान स्पर्धकाचा जादूई आवाजाने उदित नारायण खूपच आनंदी झालेले पाहायला मिळाले. या लहान गायकाला पाहून मला माझे बालपणाचे दिवस आठवल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.

यावेळी बोलताना उदित नारायण म्हणाले की, “या मुलाला पाहून मला माझे बालपणीचे दिवस आठवले. असाच हाफ पॅंन्ट, शर्ट घालून मी माझ्या भावाच्या खांद्यावर बसून यात्रेला जात होतो. यात्रेमध्ये गावकऱ्यांच्या समोर तो मला गाणे गायला लावत असे. माझा आवाज ऐकून संध्याकाळी ते मला कार्यक्रम करायला बोलवायचे. इथूनच माझ्या संगीत कारकीर्दिला सुरूवात झाली.” उदित नारायण यांचा हा किस्सा ऐकून सगळेच चकित झालेले पाहायला मिळाले.

उदित नारायण यांची प्रसिद्ध गाणी
उदित नारायण यांनी गायलेल्या सुपरहिट गाण्यांमध्ये ‘तू चीज बडी है मस्त मस्त’, ‘भोली सी सुरत’, ‘मैं यहां हूं’, ‘देखो देखो जानम’, ‘ए मेरे हमसफर’, ‘अकेले हैं तो क्या गम है’, ‘पेहला नशा’, ‘तुमचे मिलना’ यांसारख्या अनेक गाण्यांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
पहिल्या पत्नीच्या लपवून उदित नारायण यांनी केलेलं दुसरं लग्न; खुलासा झाल्यावर दिलेला नकार
स्ट्रगलच्या दिवसांत हॉटेलात गाणी गायचे उदित नारायण, तब्बल 10 वर्षांनंतर ‘या’ गाण्याने मिळाली ओळख

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा