Monday, April 28, 2025
Home बॉलीवूड श्रीदेवीलाही सौंदर्यात मागे टाकते बहिण श्रीलता, ‘या’ कारणाने राहिली सिनेजगतापासून दूर

श्रीदेवीलाही सौंदर्यात मागे टाकते बहिण श्रीलता, ‘या’ कारणाने राहिली सिनेजगतापासून दूर

सत्तर, ऐंशी आणि नव्वदच्या दशकात अभिनेत्री श्रीदेवी (Shridevi) यांचा सिनेसृष्टीत चांगलाच दबदबा होता. त्यांचे सिनेमे पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहाबाहेर अक्षरश: गर्दी करायचे. जितेंद्र आणि अनिल कपूरसोबत जोडी बनवणारी श्रीदेवी ही एक अप्रतिम अभिनेत्री होती जिच्या कारकिर्दीत एकापेक्षा जास्त हिट चित्रपट आले. लोकांना श्रीदेवीच्या कारकिर्दीबद्दल खूप माहिती आहे पण तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी माहिती आहे. श्रीदेवीने बोनी कपूर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत. पण तुम्ही कधी श्रीदेवीची धाकटी बहीण श्रीलता हिला पाहिले आहे का? चला तर त्यांची ओळख करून घेऊया.

श्रीदेवी आज आपल्यात नसली, तिचा अपघाती मृत्यू झाला असला तरी हिंदी चित्रपटसृष्टीतील श्रीदेवीचे योगदान विसरता येणार नाही. वयाच्या चौथ्या वर्षी अभिनयाला सुरुवात करणाऱ्या श्रीदेवीने शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या श्रीदेवीला त्यावेळी शाळा सोडावी लागली, जेव्हा ती सेटवर यायची तेव्हा अनेकदा तिची धाकटी बहीण श्रीलता तिच्यासोबत असायची. श्रीदेवी मोठी झाली आणि तिच्या सौंदर्याची चर्चा होऊ लागली, पण त्यावेळचे काही फोटो दाखवतात की तिची बहीण श्रीलताही सौंदर्यात कुणापेक्षा कमी नव्हती.

जरी श्रीलता प्रसिद्धीपासून दूर राहिली आणि नेहमी कॅमेऱ्यांसमोर येण्याचे टाळत असली, तरी श्रीलता श्रीदेवीसारखीच सुंदर होती. असे म्हटले जाते की, श्रीदेवीच्या या यश आणि स्टारडममागे श्रीलता हीच होती जी नेहमीच सावलीसारखी तिच्यासोबत राहिली आणि तिला सर्व प्रकारचा पाठिंबाही दिला. आपल्या अनेक जुन्या मुलाखतींमध्ये श्रीदेवीने आपल्या बहिणीची खूप आठवण काढली होती आणि तिची प्रशंसाही केली होती.असे म्हटले जाते की, श्रीदेवीच्या मृत्यूनंतर श्रीलता खूपच असहाय्य झाली होती. श्रीदेवी आता नाही यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. श्रीलता श्रीदेवीच्या आठवणींत ती सध्या प्रसिद्धीपासून दूर आयुष्य जगत आहे.

हे देखील वाचा