बिग बॉस मराठी-५ सध्या चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासूनच निक्की तांबोळीने (Nikki Tamboli) वेगवेगळ्या कारणांनी प्रेक्षकांचं लक्ष्य वेधून घेतलं आहे. कोणत्याही छोट्या कारणावरुन निक्की आणि इतर स्पर्धकांत वाद होताना दिसत आहेत. निक्कीने वर्षा उसगावकर यांच्याशी वाद घालताना त्यांना अरे तुरे करत बोलली. तिने वर्षा उसगावकर यांची अक्कलही काढली. त्यावेळी घरातील कोणताच सदस्य याबाबत काहीच बोलला नाही. पण आता सूरजने निक्कीला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.
या आठवड्यात सदस्यांना बेडवर झोपता येणार नाही, असं बिग बॉसने सांगितलं होतं. पण, वर्षा उसगावकर आणि घरातील काही इतर सदस्यांनी बेडचा वापर केला. त्यामुळे शिक्षा म्हणून आता हा संपूर्ण आठवडा सदस्यांना जमिनीवरच झोपावं लागणार आहे. यावरुन निक्की तांबोळीने वर्षा यांच्याबरोबर वाद घातला होता. “तुम्ही बेडवर बसलात, म्हणून आता आम्हाला ते भोगावं लागतंय, असं ती म्हणाली होती. आता निक्कीला गुलिगत सूरज चव्हाणने तिची चूक दाखवत सडेतोड उत्तर दिलं आहे.
सूरज, निक्की आणि वर्षा किचन मध्ये असतात. सूरज निक्कीला म्हणतो, “निक्की तु बेडवर बसली होती की नाही? मी तुला बघितलं त्यावर निक्की त्याला उत्तर देते की “हो मी बसले होते. त्यानंतर सूरज तिला म्हणतो, “तू खूर्चीवर पण बसली होती. आपल्याला भोगावं लागतंय. मग निक्की म्हणते की खूर्चीवर बसू शकतो. पण, बेडवर बसू नाही शकत. माझ्याकडून चूक झाली. मी माफी मागते”, त्यानंतर मग वर्षा आणि निक्कीमध्ये पुन्हा वाद सुरू होतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
नॉमिनेशनची तोफ मधून घरातून बाहेर पडणार हे 6 सदस्य, जाणून घ्या यादी
‘तंगड्या वर करून कॅमेऱ्यासमोर झोपते…’ बिग बॉसच्या घरातला वाद अजून पेटला, प्रसिद्ध अभिनेत्रीची तीव्र प्रतिक्रिया