बिग बॉस मराठीच्या ५ व्या सिझनला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे निक्की तांबोळी. छोट्या छोट्या कारणांवरून निक्की आणि इतर स्पर्धकांमध्ये वादविवाद होत आहेत. नुकतीच तिची वर्षा उसगावकर यांच्यासोबत चकमक उडाली. बी बॉसचा नियम मोडल्याने वर्षा उसगावकर यांच्या सोबत निक्कीने वाद घातला.
पण आता यावेळी निक्कीची जीभ जरा घसरली आहे. निक्कीने वर्षा यांचा अरे तुरे असा उल्लेख केला आहे. तसेच त्यांची अक्कल देखील काढली आहे. निक्की आणि वर्षा यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री प्रणीत हट्टे हिने देखील तिचं मत यावर मांडलं आहे. प्रणीतने तिच्या इंस्टाग्रामवर एका व्हीडीयोत म्हटले की, “ज्याप्रकारे निक्की वर्षा मॅमशी बोलत होती ते धक्कादायक होतं. निक्की कुणी का असेना, पण आपल्या सिनियर बरोबर वागण्याचा एक सेन्स असतो. संपूर्ण एपीसोडमध्ये तुम्ही पाहिलं असेल कि फक्त वर्षा मॅम सोफ्यावर बसलेल्या नव्हत्या. बाकीचे सदस्य देखील गार्डन एरिया आणि इतर ठिकाणी सोफ्यावर बसले होते.”
दुसरं म्हणजे “ तंगड्या वर करून कॅमेऱ्यासमोर झोपते… हे वाक्य किती घाणेरडं आहे. आता मला हे बघायचं आहे कि रितेशची यावर कशी प्रतिक्रिया असेल. कारण, सिनियर लोकांना घरात असं बघताना आणि त्यांना अशी वागणूक मिळतेय हे बघताना वाईट वाटतं. घरात याबाबत कुणीतरी बोललं पाहिजे. तिकडे घरात सगळे तोंड बंद करून बसले होते. एकातही निक्कीला हे बोलण्याची हिम्मत नव्हती कि “तू चुकीचं बोलतेस.” अशा तीव्र शब्दांत प्रणीतने आपला संताप व्यक्त केला आहे.
बिग बॉसने सदस्यांना बेडवर झोपता येणार नाही. असं सांगितलं होतं. पण काही सदस्यांनी हा नियम मोडल्याने नंतर सर्वांना शिक्षा मिळाली कि कुणालाही आता बेड मिळणार नाही. यानंतर या वादाला तोंड फुटले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
आमिरने साजरं केलं मुलाचं यश ! ‘महाराज’च्या सक्सेस पार्टीचे फोटोज व्हायरल
तब्बल २३ वर्षांनी महेश बाबूचा चित्रपट होणार प्रदर्शित, ‘मुरारी’ साठी चाहते झालेत उत्सुक