बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे आज जरी कोट्यवधींचे मालक असले, तरीही त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात शून्यातून केली होती. या चंदेरी दुनियेत येऊन नाव कमावण्यासाठी अथक प्रयत्न केले. काहीजणांनी त्यांच्या अभिनयाने नाव कमावले, तर काहींनी सौंदर्याच्या जोरावर नाव कमावले. मात्र, काहीजण तर अनोख्या आणि दमदार आवाजाने देखील लोकप्रिय झालेत. याच यादीतील एक मोठे नाव म्हणजे अभिनेते सुरेश ओबेरॉय (Suresh Oberoi).
सुरेश ओबेरॉय यांनी वजनदार आवाज आणि दमदार अभिनयाच्या बळावर सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. शुक्रवारी (१७ डिसेंबर) रोजी सुरेश ओबेरॉय त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग जाणून घेऊयात या अभिनेत्याबाबत कधीही न ऐकलेल्या खास गोष्टी.
सुरेश ओबेरॉय यांचा जन्म १७ डिसेंबर १९४६ रोजी पाकिस्तानमधील क्वेटा येथे झाला आहे. त्यांनी त्यांच्या मेहनतीने आणि कष्टाने ८०-९० च्या दशकात त्यांची सर्वत्र ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये काम करून त्यांनी १९८७ मध्ये सर्वोत्तम सहाय्यक अभिनेते म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. त्यांच्या दमदार आवाजाने त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांना मागे सारले होते. शून्यातून सुरुवात केलेल्या या अभिनेत्याची आताची संपत्ती ऐकून तुमचे डोळे फिरतील. (Suresh Oberoi celebrate his birthday, lets know about his property)
कोट्यावधींचे मालक आहेत सुरेश ओबेरॉय
भारत आणि पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली, तेव्हा सुरेश यांचे कुटुंब क्वेटावरून हैद्राबाद येथे स्थलांतर झाले. लहान असल्यापासून त्यांना अभिनयाची आवड असल्याने अभिनयात करिअर करण्यासाठी डोळ्यात हजारो स्वप्न घेऊन ते मुंबईमध्ये आले. ते जेव्हा मुंबईला पोहचले तेव्हा त्यांच्या खिशात केवळ ४०० रुपये होते. आज त्यांच्या मेहनतीने त्यांनी कोट्यावधींची संपत्ती कमवली आहे. एका वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सुरेश यांचे नेटवर्थ ८ मिलियन डीलर एवढे आहे. म्हणजेच भारतीय चलनात ६१ कोटी एवढे पैसे आहेत. याशिवाय त्यांच्याकडे मर्सिडीझ, रेंज रोव्हर यांसारख्या ५ गाड्या आहेत.
रेडिओमधून केली करिअरची सुरुवात
सुरेश ओबेरॉय यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात रेडिओवरून केली होती. सुरेश हे दिसायला अगदी हँडसम होते. त्यामुळे त्यांनी मॉडेलिंगमध्ये देखील अगदी आरामात काम मिळू लागले. यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यांना ‘जीवन मुक्त’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर १९८० मध्ये त्यांना ‘एक बार फिर’ या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम मिळाले.
विविध भाषांमध्ये सुरेश आहेत पारंगत
सुरेश यांना मुख्य अभिनेता म्हणून जास्त काम मिळाले नाही. परंतु सहाय्यक अभिनेता म्हणून त्यांना इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले आहे. त्यांनी ‘लावारिस’, ‘मिर्च मसाला’, ‘एतबार’, ‘कर्तव्य’, ‘सुरक्षा’, ‘खंजर’ यांसाख्या सुपरहिट चित्रपटात काम केले. त्यांना हिंदी, इंग्रजी, पंजाबी, तेलुगू, तमिळ यांसाख्या भाषा येतात.
सुरेश ओबेरॉयच्या कुटुंबाबाबत बोलायचे झाल्यास, त्यांचे लग्न १९७४ मध्ये यशोधरा ओबेरॉयसोबत झाले. त्यांचा मुलगा विवेक ओबेरॉय हा देखील एक नावाजलेला अभिनेता आहे. त्यांना एक मुलगी देखील आहे. तिचे नाव मेघना ओबेरॉय हे आहे. सुरेश सध्या लाईमलाईटपासून दूर आहेत, तरी देखील सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.
हेही वाचा :