अंकिता रॉक, फॅन्स शॉक! अभिनेत्रीने परिधान केला तब्बल १६०० तासात बनलेला लेहंगा, जाणून घ्या का आहे खास?


सन २०२१ हे वर्ष अनेक कलाकारांसाठी खास ठरले आहे. कारण, याच वर्षात रोमँटिक जोडप्यांनी आपला जीवनसाथी निवडून त्याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. यामध्ये समावेश होतो तो म्हणजे छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अभिनय करून चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या अंकिता लोखंडेचा. अंकिताने १४ डिसेंबर, २०२१ रोजी व्यावसायिक विकी जैनसोबत संसार थाटला. ती लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात खूपच सुंदर दिसत होती.

दरम्यान तिने नवरीच्या रूपात एन्ट्री घेण्यासाठी सोनेरी रंगाच्या लेहंग्याची निवड केली होती. आता तिच्या या लूकची सर्वजण खूप प्रशंसा करत आहेत. विशेष म्हणजे, अंकिताच्या लग्नानंतर प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राच्या एका पोस्टने प्रत्येकाला हैराण केले आहे. आपल्या या पोस्टमध्ये मनीषने अंकिता आणि विकीच्या लग्नाच्या कपड्यांबाबत सांगितले आहे.

मनीषने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर अंकिता लोखंडेच्या (Ankita Lokhande) फोटोंची एक सीरिज (मालिका) शेअर केली आहे. त्याचसोबत त्याने खुलासा केला आहे की, तिचा लग्नातील लेहंगा बनवण्यासाठी तब्बल १६०० तास लागले होते. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “पहिली छाप ही दीर्घकाळ चालणारी असते. त्यामुळे आमच्या अंकिताने शानदार एन्ट्री केली. आमच्या १६०० तासांच्या शिल्प कौशल्यात तिचा सोनेरी क्षणांचा प्रत्येक मिनिट जगताना एका सुंदर नवरीचा ड्रेस, केवळ हाताने भरतकाम केलेली भौमितिक कलाकृती, ज्यात सोन्याचे क्रिस्टल मणी आणि प्राचीन जरदोजी, लटकनसह जोडलेले आहे.”

मनीषच्या या पोस्टला हजारो लाईक्स मिळाले आहेत. तसेच या पोस्टवर चाहते कमेंट करून नवविवाहित जोडप्याची प्रशंसा करत आहेत.

सध्या अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाचे तसेच त्यानंतरच्या विधींचे व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये अंकिता पारंपारिक गुलाबी रंगाची साडी नेसल्याने ती खूपच सुंदर दिसत होती. तिने बिंदी, सिंदूर आणि मंगळसूत्राने तिचा लूक पूर्ण केला. त्याचवेळी विकीने हिरव्या रंगाचा कुर्ता घातला होता.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!