Thursday, September 28, 2023

महागड्या गाड्या अन् कोटींचा बंगला! ‘अशी’ लाईफस्टाईल जगतो अभिनेता सुर्या

अलीकडेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकलेल्या साऊथ सुपरस्टार सुर्याला (Suriya Sivakumar) कोणत्याही परिचयाची गरज नाही. सुर्याने साऊथ सिने इंडस्ट्रीत स्वत:चे एक खास स्थान निर्माण केले आहे. दरम्यान, आम्ही तुम्हाला या दिग्गज कलाकाराच्या जीवनशैलीविषयी माहिती सांगणार आहोत. सुर्या एका चित्रपटासाठी किती फी घेतो, हे देखील जाणून घेऊया. 

अशी आहे सूर्याची जीवनशैली
खरं तर, २०२० मध्ये सूर्याच्या सुपरहिट चित्रपट ‘सूरराई पोत्रू’साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुर्याची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड झाली आहे. तेव्हापासून सूर्याच्या नावाची चर्चा सर्व बाजूंनी जोर धरू लागली आहे. दरम्यान, सूर्याच्या जीवनशैलीबद्दल सांगायचे झाल्यास, सूर्या त्याची पत्नी ज्योतिका आणि मुलांसोबत चेन्नईतील एका आलिशान घरात आनंदी जीवन जगतो. (suriya net worth and lifestyle)

सूर्याकडे ऑडी Q7, Audi A7, Toyota Fortuner, Jaguar XF आणि Mercedes Benz सारख्या महागड्या कार आहेत. एसके व्यतिरिक्त, फोर्ब्स मॅगझिननुसार, सूर्याची एकूण संपत्ती सुमारे १८६ कोटी आहे. इतकेच नाही, तर काही मीडिया रिपोर्ट्सनुसार सूर्या महिन्याला १.५ कोटी रुपये कमावते. जे वर्षाला सुमारे ३० कोटींहून अधिक होते.

चित्रपटासाठी किती फी घेतो सुर्या
दुसरीकडे, सुर्याच्या एका चित्रपटाच्या फीबद्दल विचार केला, तर हा साऊथ सुपरस्टार एका चित्रपटासाठी सुमारे २० ते २५ कोटी इतकी मोठी रक्कम घेतो. इतकेच नाही, तर ब्रँड प्रमोशनसाठी सूर्या कोणत्याही टीव्ही जाहिरातीसाठी २ कोटी रुपयांपर्यंत शुल्क आकारतो. १९९७ मध्ये ‘नेरुक्कू नेर’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या सुर्याने आतापर्यंत ५२ चित्रपट केले आहेत.

अभिनेता सुर्या हा दाक्षिणात्य सिने जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. सुर्याचा फक्त दाक्षिणात्य सिने जगताच नव्हेतर बॉलिवूडमध्येही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. २०२१ मध्ये सुर्याचा ‘जयभीम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याची जगभरात चर्चा झाली होती. या चित्रपटाची ऑस्करसाठीही निवड करण्यात आली होती. परंतु चित्रपटाला हा पुरस्कार मिळू शकला नाही. परंतु आता ऑस्करने अभिनेता सुर्याला अकडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स एंड साइसेंस तर्फे जाहीर केलेल्या ३९७ मान्यवरांच्या यादीत स्थान दिले आहे. असा सन्मान मिळवणारा तो एकमेव साऊथ अभिनेता आहे.

अधिक वाचा- 
बाबो!!! अल्लू अर्जुनकडून ‘पुष्पा 2’चा डायलॉग लीक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
नाकातून गातो म्हणून टीकेचा धनी ठरणाऱ्या हिमेशला ‘भाईजान’ने दिलेला पहिला ब्रेक, 120सिनेमांना दिलंय संगीत

हे देखील वाचा