Saturday, November 23, 2024
Home साऊथ सिनेमा संपता संपत नाहीये ‘जय भीम’ चित्रपटाचा वाद, ट्विटरवर #SuriyaHatesVanniyars हॅशटॅग जोरदार ट्रेंड

संपता संपत नाहीये ‘जय भीम’ चित्रपटाचा वाद, ट्विटरवर #SuriyaHatesVanniyars हॅशटॅग जोरदार ट्रेंड

दाक्षिणात्य चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेता सुर्याचा ‘जय भीम’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून वन्नियार समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, ट्विटरवर #SuriyaHatesVanniyars हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे. ज्याद्वारे युजर्स सातत्याने अभिनेत्याविरोधात संताप व्यक्त करत आहेत. युजर्स अभिनेत्याला माफी मागण्याची मागणी करत आहे. वन्नियार समाजाच्या लोकांचे म्हणणे आहे की, या चित्रपटातून त्यांची प्रतिष्ठा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकांचा रोष पाहून चेन्नईतील अभिनेत्याच्या घराबाहेरही खबरदारी देखील वाढवण्यात आली आहे.

ट्विटरवर #SuriyaHatesVanniyars या हॅशटॅगसह पोस्टचा पूर आलेला पाहायला मिळत आहे. एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “मी सूर्याचा तीव्र निषेध करतो. ‘जय भीम’ मध्ये वन्नियार यांच्या विरोधात अपमानास्पद दृश्ये दाखवण्यात आली आहेत.” त्याचवेळी, आणखी एका युजरने ट्वीट केले आहे की, “सुर्या आणि ज्ञानवेलने चित्रपटात वन्नियार यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने आपल्या चित्रपटात वस्तुस्थिती चुकीची मांडली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही दाखवू शकता.” (suriya hates vanniyars trends on twitter netzens demands actor suriya to say sorry to vanniyars)

पाहा हे ट्वीट्स

काय आहे नेमका वाद
अभिनेता सूर्याचा ‘जय भीम’ हा चित्रपट २ नोव्हेंबरला ऍमेझॉन प्राइमवर रिलीझ झाला आहे. या चित्रपटात अभिनेता तामिजने सब-इन्स्पेक्टर गुरुमूर्तीची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या एका सीनमध्ये गुरुमूर्ती मद्यपान करत असताना, भिंतीच्या मागे जातीय प्रतीक दाखवले गेले आहे. यावर वन्नियार समाजाने तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. समाजाचे म्हणणे आहे की, तो सिव्हिल आणि क्रिमिनल अशा दोन्ही प्रकारच्या गुन्हेगारी श्रेणीत येतो. वन्नियार आणि वन्निया कुला क्षत्रिय हे दोघेही तामिळनाडूतील अतिशय मागासलेले समुदाय आहेत. राज्यातील उत्तरेकडील राज्यांमध्ये त्यांची संख्या अधिक आहे.

हा चित्रपट रिलीझ झाल्यापासून वादात सापडला आहे. यापूर्वी अभिनेता प्रकाश राज यांनी एका दृश्यात हिंदीत बोलल्याबद्दल एका व्यक्तीला कानाखाली मारल्याने वाद निर्माण झाला होता. त्यानंतर एका मुलाखतीत त्यांना देखील स्पष्टीकरण द्यावे लागले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शोएब- दीपिकाच्या कुटुंबातील ‘या’ सदस्याने गमावले प्राण, लाडक्याच्या जाण्याने अभिनेत्रीला अश्रू अनावर

-जेव्हा आपला चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात पोहचल्या साधना; दिसले ‘असे’ काही की, मैत्रिणींसमोरच कोसळले रडू

-खरंच की काय! तिसरं लग्न करायला आमिर खान झालाय सज्ज? ‘या’ अभिनेत्रीसोबत रंगलीय लग्नाची चर्चा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा