Sunday, May 19, 2024

रस्ते अपघातात निधन झालेल्या चाहत्याच्या घरी पोहोचला सूर्या; चाहते म्हणाले, ‘हा खरा हिरो…’

गेल्या वर्षी ‘सोरारई पोटरु’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारा साऊथचा सुपरस्टार सूर्याला वेगळ्या ओळखीची गरज नाही. सूर्या त्याच्या दमदार अभिनयासाठी जगभरात प्रसिद्ध आहे, त्यामुळे सूर्याची फॅन फॉलोइंगही खूप जास्त आहे. नुकतेच एका सूर्याच्या चाहत्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. दरम्यान, आता अभिनेता सूर्या त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी चाहत्यांच्या घरी पोहोचला असून, तेथे सूर्याने चाहत्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख शेअर केले आहे.

या दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हे फोटो पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत. सूर्य (Suriya )फॅन क्लब पेज सोशल मीडियावर चालवले जाते. या फॅन क्लबच्या अरविंद नावाच्या सदस्याचा नुकताच रस्ता अपघातात मृत्यू झाला. सूर्याला ही माहिती मिळताच तो क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या घरी पोहोचला आणि अरिवंदला श्रद्धांजली वाहिली.

यासोबतच सूर्याने अरविंदच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केले आहे. सूर्या फॅन्स क्लबने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या प्रसंगाचे ताजे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये सूर्या त्याच्या चाहता अरविंदच्या फोटोसमोर हात जोडून श्रद्धांजली वाहताना दिसत आहे. इतर फोटोंमध्ये सूर्या देखील अरविंदच्या कुटुंबाचे दुःख शेअर करताना दिसत आहे. सूर्यासारखा कलाकार त्याच्या चाहत्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांच्या घरी गेल्याचे फार कमी वेळा घडते.

सूर्याच्या या वागण्याचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे . चाहते या फोटोंवर कमेंट करत आहेत आणि त्याच्या चाहत्यांबद्दल असलेल्या सहानुभूतीबद्दल सूर्याचे कौतुक करत आहेत. एका यूजरने कमेंट करून लिहिले आहे – “सूर्या हा खरा हिरो आहे.” आणखी एका यूजरने लिहिले आहे – “आजकाल अपघात पाहिल्यानंतर लोक त्या व्यक्तीला रस्त्यावर सोडून जातात. पण जो अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्याचे दु:ख वाटून घेण्यासाठी चाहत्याच्या घरी पोहोचला तोे सूर्या आहे, सलाम.” येत्या काळात सूर्या ‘कांगुवा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहे. (Suriya reached Arvind house who died in a road accident)

आधिक वाचा-
अभिनेता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून शान आला होता इंडस्ट्रीत; वयाच्या 17व्या वर्षी मिळाली गाण्याची संधी
प्रिया बापट आणि उमेशचा ‘तो’ रोमॅंटिक फोटो पाहून चाहते ही लाजले; म्हणाले, ‘आई गं…’

हे देखील वाचा