Tuesday, April 23, 2024

‘छिछोरे’ चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याचा अमेरिकेत मोठा अपघात, हाताला फ्रॅक्चरसह झाल्या अनेक जखमा

अभिनेता नवीन पॉलिशेट्टी हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या छिछोरे (Chhichore) चित्रपटातील भूमिकेसाठी ओळखला जातो. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतचीही मुख्य भूमिका होती. अलीकडेच या अभिनेत्याचा अमेरिकेत अपघात झाला. अभिनेता सध्या बरा होत असून त्याच्या हाताला फ्रॅक्चरसह अनेक जखमा झाल्या आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार, नवीन अमेरिकेतील डलासमध्ये बाईक चालवत असताना त्याचे नियंत्रण सुटले आणि त्याची बाईक रस्त्यावर घसरली. नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करूनही, तो त्याचा तोल सांभाळू शकला नाही आणि तो पडला, परिणामी अनेक जखमा झाल्या. या अभिनेत्याच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून तो सध्या अमेरिकेत उपचार घेत असून प्रकृतीत आहे. नवीन यांनी अद्याप त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.

नवीन प्रामुख्याने तेलुगु चित्रपट श्रेत्रात काम करतो आणि त्याने 2019 मध्ये एजंट साई श्रीनिवास अथरेया या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. चित्रपटासाठी पुरस्कार जिंकल्यानंतर, तो त्याच वर्षी सुपरहिट बॉलिवूड चित्रपट छिछोरेमध्ये दिसला. या चित्रपटातील नवीनच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले होते. लोकांनी त्यांना आणखी अनेक चित्रपटांमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता या बातमीने अभिनेत्याच्या चाहत्यांची मनं तुटली आहेत.

नवीनने छिछोरेमध्ये ॲसिडची भूमिका साकारली होती, जो सुशांत सिंह राजपूतच्या सर्वात चांगल्या मित्रांपैकी एक होता. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूर, वरुण शर्मा, ताहिर राज भसीन, तुषार पांडे आणि सहर्ष कुमार शुक्ला यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट हिट ठरला होता आणि प्रेक्षकांनी त्याचे खूप कौतुक केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सारा अली खान अशाप्रकारे ट्रोलर्सला करते मॅनेज; म्हणाली, ‘मी माझी चमडी…’
‘द केरला स्टोरी’ चित्रपट करणारी अदा इफ्तार पार्टीत दिसल्याने झाली ट्रोल, चाहते म्हणाले…

हे देखील वाचा