Sunday, April 14, 2024

सुशांत सिगं राजपूत आत्महत्या की हत्या? पोस्टमार्टम कर्मचाऱ्याचे खळबळजनक वक्तव्य

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर चित्रपटसृष्टीच नाही तर राजकारणातही गदारोळ उठला आहे. सुशांतचा मृत्यू (दि, 14 जून 2020) रोजी झाला असून तब्बल अडीच वर्षानंतर या प्रकरणाला वेगळंच वळन आलं आहे. नुकतंच पोस्टमॉर्टम विभागातील एका कर्मचाऱ्याने खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे अनेकांना ही बातमी ऐकूण आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.

लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput)  हा आपल्या अभिनयाच्या स्वबळावर बॉलिवूडसारख्या इंडस्ट्रीमध्ये त्याने वेगळे स्थान निर्माण केले होते. जेव्हा त्याने आत्महत्या केल्याचे समजले तेव्हा अनेकांनी प्रश्न निर्माण केले होते. त्याशिवाय अनेकांना मोठा धक्काही बसला होता. मात्र, काही दिवसानंतर हे प्रकरण दाबलं गेलं. पण पुन्हा एकदा हे प्रकरणातून मोठी बातमी समोर आली आहे. कूपर रुग्णालयात सुशांत सिंग राजपूतचे पोस्टमॉर्टम करणारे रूपकुमार शाह (Rupkumar Shah) यांनी म्हटलंय की, सुशांतने आत्महत्या केली नव्हती, तर त्याची हत्या झाली होती आणि त्याच्या शरीरावर जखमांचे व्रण होते. कर्मचाऱ्याच्या अशा वक्तव्यानंतर सुशांतचे वकिल विकास सिंह यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पोस्टमार्टम कर्मचारी रूपकुमार शाह यांनी सांगितले की, “सुशांतचा सिंगचा मृत्यू झाला तेव्हा आमच्याकडे 5 ते 6 मृतदेह पोस्टमार्टमसाठी आले होते. त्यापैकी केलेली एक व्हीआयपी मृतदेह आला होता. जेव्हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी टेबलवर घेतला तेव्हा आम्हाला समजलं की, हा सुशांत सिंग राजपूत आहे. त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आणि गळ्यावर दोन निशान होते, हातपायावर मार लागल्याने तुटल्यासारख्या खुना होत्या. आमच्य मते त्याचा व्हिडिओ काढायला हवा होता मात्र, अधिकीऱ्यांनी फक्त फोटो काढायला सांगितलं. आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की, ही हत्या वाटत आहे, त्या पद्धतीने त्यावर काम करावं . पण वरिष्ट म्हणाले की, पोस्टमार्टम करुन लगेच मृतदेह द्यायचा आहे.”

सुशांतच्या प्रकरणाविषयी बोलत असताना वकील विकास सिंग यांनी एका मुलाखतीदम्यान सांगितले की, “आपल्याकडे सुशांतला झालेल्या दुखापतींबद्दल कोणतीच माहिती नाही. सुशांतच्या बहिणींनी मला याबद्दल सांगितलं नाही त्यामुळे मी यावर काहीच भाष्य करु शकत नाही. मात्र, सुशांतची आत्महत्या ही साधी नव्हती त्यामागे कट रचला गेला होता आणि केवळ सीबीआयच त्याच्या मृत्यूमागील कट उलगडू शकेल.”

सुशांतने (दि,14 जून 2020) रोजी मुंबई वांद्रामधील त्याच्या राहत्याघरी आत्महत्या केलेल्या अवस्थेत सापडला होता. अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र खळबळ माजली होती. यांनंतर मुंबई पोलीस, ईडी, सीबीआय आणि एनसीबी या सर्व तपास यंत्रणांनी या प्रकरणी तपासणी केली आणि शेवटी सुशांतची हत्या नाही, तर आत्महत्याच होती, असा निर्णय अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, कपूर रुग्णालयातील कर्मरचाऱ्याने  केलेल्य वक्तव्यानंतर हे प्रकरण कोणतं वळण घेईल हे पाहाणे खूपच महत्वाचं ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा सलमान खानला पहिल्यांदा पाहून कियारा आडवाणीची बोलतीच झाली होती बंद, वाचा तो किस्सा
सलमान खानला येणाऱ्या धमक्यांमागे १९८८ साली घडलेली ‘ती’ घटना आहे कारणीभुत, वाचा संपूर्ण स्टोरी

हे देखील वाचा