Saturday, April 20, 2024

सलमान खानला येणाऱ्या धमक्यांमागे १९८८ साली घडलेली ‘ती’ घटना आहे कारणीभुत, वाचा संपूर्ण स्टोरी

अभिनेता सलमान खानला (Salman Khan) आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीने बॉलिवूडमध्ये चांगलाच गदारोळ माजला आहे. सलमान खानच्या सुरक्षेततही मोठी वाढ करण्यात आली आहे. पण नेमकी ही धमकी का आली, आणि यामागे कोण सहभागी आहे याची एक रंजक कहाणी आहे. पाहूया काय आहे सलमान आणि काळवीट प्रकरण.  गोष्ट आहे 1998 सालची. ठिकाण राजस्थान. एका चित्रपटाचे राजस्थानमधील जोधपूर येथे शूट सुरू होतं. चित्रपटाने अनेक स्टार होते. त्यातही एक युवा अभिनेता होता. त्यावेळी तो लाखो दिलों की धडकन होता. अनेक तरुणींचा तो क्रश होता. त्याच्यावरही जवानीचा जोश सवार होता. याच जोशात एका भयान रात्री तो त्याच्या साथीदार ऍक्टर्सला घेऊन शिकारीसाठी बाहेर पडला. एका जिप्सीत ते जात होते. तिथेच राजस्थानमधील वाळ एका गावाच्या जवळच्या जंगलात जिप्सी वळवली. तिथं त्यांना दिसला काळवीटांचा कळप. काळवीट आपले आपल्या वाटेने चालले होते. त्या काळवीटांच्या कळपाकडं जिप्सीत बसलेल्या सर्वांच लक्ष होतं. तीच वेळ त्यांनी साधली. त्या युवा अभिनेत्याने त्याच्या बंदूकीने निशाणा लावला आणि आवाज आला थाड…

त्या बंदूकीतून निघालेल्या गोळ्यांनी दोन काळवीटांचा घात केला. पण घात करणाऱ्यांच्या लक्षात आलं आता आपल्याला कोणी पाहिलं तर काही खरं नाही, त्यांनी काढता पाय घ्यायचा ठरवलं आणि ते पळून जाऊ लागले. तरी गोळीचा आवाज झाला म्हटल्यावर गाव उठलं होतं. गावकरी जमा झाले त्यांच्यातील काहींनी जिप्सीतील माणसांनाही पाहिलं… त्यांना समोर 2 काळवीट निपचीप पडलेली दिसली, त्यांनी त्यांना उचलला आणि अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी खड्डा करत पुरलं. त्यावर झाड लावलं… पण ही रात्र काळरात्र ठरली, पण त्या निष्पाप काळवीटांसाठी नाही, तर त्या अभिनेत्यासाठी तेही गेली 23 वर्षे… हो गेली 23 वर्षे हिच काळवीटं त्या अभिनेत्याला पुरून उरलीत… कोण होता तो अभिनेता… तर तो होता सलमान खान

सलमान खान हे नाव ऐकलं तरी अनेक चित्रपट तुमच्या डोळ्यासमोर उभे राहत असतील, पण त्याने जेवढी प्रसिद्धी या चित्रपटांमधून कमावली, तेवढाच त्याला मनस्ताप झाला तो काळवीट शिकार प्रकरणात. गेल्या 23 वर्षांपासून त्याच्यावर गुन्हा दाखल असून अजूनही त्या प्रकरणातून त्याची सुटका झालेली नाही. त्याच्यावर आणि त्याच्यासह सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, निलम आणि अन्य दोन व्यक्तींवर हम साथ साथ है चित्रपटाच्या शूटींग दरम्यान सप्टेंबर 1998 साली काळवीट शिकारी प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यासाठी त्याला जेलमध्येही जावं लागलं. गेली २३ वर्षे ही केस कोर्टमध्ये सुरू आहे. या प्रकरणात सुरूवातीला सलमानवर 5 वर्षांचा कारावास आणि 2 लाख 50 हजारांचा दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली. पुढे सलमानवर परदेशात जाण्यासाठीही स्थगिती लागली. या केसने पुढील काही वर्षांत देखील अनेक वळणं घेतली.

यातील महत्त्वाची वळणं ठरली ती म्हणजे 2016 साली राजस्थान उच्च न्यायालयाने पुराव्यांअभावी सलामनची निर्दोष मुक्तता केली. पण राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागितली आणि पुन्हा ही केस सुरू झाली. या दरम्यान सलमानला अनेकदा जेलमध्ये जावं लागलं, तो बेलवर सुटलाही… परंतु, त्याच्याबरोबर असलेल्या अन्य साथीदार ऍक्टर्सची मात्र 2018 साली पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तात झाली. असे असले तरी सलमानला मात्र ते काळवीट शिकार प्रकरण पुरून उरलं. आजही त्याच्यावरील ही केस सुरूच आहे… या प्रकरणाने सलमानच्या प्रतिष्ठेला मात्र मोठा धक्का दिलाय

बरं हे प्रकरण कोर्टात अजून सुरू असलं तरी कोर्टाबाहेरही सलमानसाठी काळवीट शिकार डोकेदुखीच ठरली. त्याला कारण म्हणजे राजस्थानमधील बिश्नोई समाजासाठी काळवीट पुजनीय आहेत. त्याचमुळे सलमानने काळवीटांची हत्या केल्यानं तिथे त्याबद्दल प्रचंड राग आहे. याचमुळे भारतातील कुप्रसिद्ध गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकीही दिलीय. जवळपास 600 शूटरची गँग असलेल्या लॉरेन्स बिश्नोई गँग सध्या चर्चेत आहे, ते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणामुळे. या हत्येमागे हीच गँग असल्याची माहिती समोर आली होती.

आता याच गँगकडून सलमानलाही धमकी येत असल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्यात. त्यामुळे सलमानच्या सिक्यूरिटीमध्येही वाढ करण्यात आली, त्याचबरोबर लॉरेन्स बिश्नोईलाही तिहारमध्ये स्पेशल जेलमध्ये पाठवण्यात आलंय… या प्रकरणाकडे पाहून एवढंच वाटतं चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला… असो, यातून हे मात्र नक्की तुम्ही कितीही नाव कमवा, पण तुमच्याकडून झालेली एक मोठी चूक तुमच्या आयुष्याला पुरून उरू शकते.(salman khan blackbuck poaching case)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तूच खरा देवदूत! सलमान खानने वाचवला होता अभिनेत्री दिया मिर्झाच्या आईचा जीव, एकाच फोनवर पोहोचला होता घरी

सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडने केले गंभीर आराेप; म्हणाली, ‘सिगारेटचे चटके देऊन…’

 

हे देखील वाचा