Tuesday, March 3, 2026
Home बॉलीवूड जगाला निरोप देण्यापूर्वी ‘या’ कलाकारांनी कमावलीय करोडोची मालमत्ता; सुशांतसिंग राजपूतचाही आहे समावेश

जगाला निरोप देण्यापूर्वी ‘या’ कलाकारांनी कमावलीय करोडोची मालमत्ता; सुशांतसिंग राजपूतचाही आहे समावेश

कोरोनाच्या लाटेचा परिणाम केवळ सामान्य माणसाच्या जीवनावरच झाला नाही, तर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या जीवनावरही त्याचा खोल परिणाम झाला आहे. २०२०मध्ये कोरोना दरम्यान, अनेक कलाकार आर्थिक संकटाला बळी पडले आणि त्यांनी त्यांची स्थिती अनेकदा व्यक्त परिणाम केली. तसेच काही कलाकार असेही आहेत, ज्यांनी मागच्या वर्षी या जगाला निरोप दिला. दरम्यान, सुशांत सिंग राजपूत असो किंवा इरफान खान, आजही हे प्रसिद्ध कलाकार आपल्यासोबत नाहीत, यावर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे.

आपल्या देशात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये अगदी छोट्या स्तरापासून दमदार कामगिरी करुन यश मिळवले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी आपल्या मेहनतीने प्रचंड संपत्तीही कमावली. नाव आणि प्रसिद्धी मिळवण्याव्यतिरिक्त, या कलाकारांनी त्यांच्या कुटुंबासाठी इतकी संपत्ती कमावली आहे की, त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही वाईट टप्प्यातून जावे लागणार नाही. जाणून घेऊयात अशा कलाकारांबद्दल, जे प्रचंड संपती आपल्या मागे टाकत जग सोडून गेले आहेत.

सुशांतसिंग राजपूत
सुशांतसिंग राजपूतने जगाला अचानक निरोप दिला, त्यामुळे चाहते प्रचंड दुःखी झाले होते. सुशांतचे चाहते आजही त्याला विसरु शकत नाहीत. १४ जून २०२०रोजी जेव्हा सुशांतचे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली‌, तेव्हा या बातमीमुळे सर्वांनाच धक्का बसला. आजही सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याला न्याय मिळवून देण्यासाठी लढत आहेत. सुशांत सिंगने टीव्ही सिरीयलमधुन नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सुशांतची सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये गणना केली जाते. पण जग सोडून जाण्यापूर्वी सुशांतने त्याच्या कुटुंबासाठी प्रचंड मालमत्ता कमवाली आहे. त्यांची एकूण संपत्ती ४४७ कोटींच्या जवळपास आहे.

इरफान खान
बाॅलिवूडसह आंतरराष्ट्रीय अभिनेते म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे इरफान खान. त्यानी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपटामध्ये काम केले. इरफान यांच्या जाण्याने अनेक चाहत्यांचे मन दुखावले गेले. बाॅलिवूडचे एक महान कलाकार गमावल्याचे दुःख सर्वजण आजही व्यक्त करतात. कर्करोगाच्या प्रदीर्घ आजाराशी झुंज दिल्यानंतर २९ एप्रिल २०२० रोजी त्यांचे निधन झाले. तर त्यांची एकूण संपत्ती ३२० कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

ऋषी कपूर
ऋषी कपूर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात अगदी लहान वयातच केली. त्यांनी बालकलाकार म्हणून ‘मेरा नाम जोकर’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आणि ‘बॉबी’ मधील त्यांच्या व्यक्तिरेखेने सर्वांचीच मने जिंकले. ऋषी यांनी ८०-९०च्या काळापासून आजपर्यंत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. बॉलिवूडमध्ये त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. ऋषी यांनी २०२० मध्ये कर्करोगाशी झुंज देत जगाचा निरोप घेतला. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी ३०० कोटींची मालमत्ता कमवाली आहे.

ओम पुरी

ओम पुरी त्यांच्या अभिनयासाठी तसेच त्यांच्या आवाजासाठी ओळखले जातात. ओम पुरी यांची गणना बॉलिवूडमधील बहुमुखी कलाकारांमध्ये केली जाते. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले. पण ६ जानेवारी २०१७ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची संपत्ती अंदाजे १५१ कोटी रुपयांच्या आसपास आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश

-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ

हे देखील वाचा