Friday, July 5, 2024

‘पेहराव नंगटपणा असेल तर मग अमृता फडणवीसला …’, सुषमाताई अंधारेंचा चित्रा वाघ यांना खोचक सवाल

सोशल मीडिया इनफ्लूएंसर आणि अभिनेत्री उर्फी जावेद हिने आपल्या आगळ्या वेगळ्या फॅशेन सेन्सने लाखो लोकांवर राज्य करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर “असा नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही. मला जर ती कुठे भेटली तर मी तिला थोबडवून काढेन.” असा इशारा दिला आहे. पण दोघींच्या वादामध्ये तिसऱ्याच व्यक्तीने उडी घेतली आहे. चित्रा वाघ यांच्या अशा वक्तव्यानंतर शिवसेना पक्षाच्या उपनेता सुषमा ताई अंधारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना पक्षाच्या उपनेता सुषमा ताई अंधारे (Sushma Tai Andhare) यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना सवाल केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर कंगना रनौत (Kangna Ranaut), केतकी चितळे (Ketaki Chitale) , देवेंद्र फडणवीस यांची बायको अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांचे अर्धवट कपड्यामधील फोटो शेअर करत प्रश्न विचारला आहे की, “उर्फी जावेद (Urfi Javed) हिच्या वेषभूषेवर तुमचा आक्षेप असेल तर मग कंगना रानौत, अमृता फडणवीस, आणि केतकी चितळे यांच्या वेषभूषेवर आक्षेप घेणार का?” असा खोचक प्रश्न सुषमा ताईंनी मांडला आहे.

सुषमा ताईंनी फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिले की, “मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त ‘कम्फर्टेबल’ आणि ‘कॉन्फिडंट’ वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव बहुतांशी वेळा साडीच असतो, फार फार तर मी सलवार सूट परिधान करते. यामुळे इतरांनीही माझ्यासारखाच पेहराव करावा, असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये ‘कम्फर्टेबल’ वाटतं, त्याप्रमाणे तो कपडे परिधान करतो. प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरजसुद्धा असते. उदाहरणार्थ, टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच…”

सुषमा ताईंनी पुढे लिहेल की, “अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया… पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल, तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेदसारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणौत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना मारहाणीची भाषा कराल का?” असा प्रश्न आंधारेंनी विचारला आहे.

आंधेरंनी चित्रा वाघ यांना टोला देत म्हटलंय की, “नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धीझोतात आणि चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल…” असंही अंधारे म्हटल्या आहेत. उर्फी आणि चित्रा वाघ यांच्या वादाशिवया समाजातील अनेक मुद्दे आहेत ज्यावर आजही लक्ष दिलं जात नाही. असा सवाल देशातील नागरिकही करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
…आशीर्वाद देणारे आहेत “पंत” प्रसाद ओकच्या नव्या सिनेमाची घोषणा, साकारणार ही मोठी भूमिका
आलिया लग्नाआधी प्रेग्नंट होती का? यावेळी स्वत: अभिनेत्रीनेच केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा