आजच्याच दिवशी बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. २१ मे १९९४ रोजी वयाच्या अवघ्या १ व्या वर्षी हा मुकुट आपल्या नावावर करून, तिने एक नवा इतिहास रचला. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला होती. तिने ७७ देशांतील स्पर्धकांना मागे टाकत, ही स्पर्धा जिंकली होती. आता या विजयाला २८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, अभिनेत्रीने एक ट्वीट केले आहे. ज्यामध्ये तिने ते सुवर्णक्षण आठवले आहेत.
अभिनेत्रीचं ट्वीट
स्वतःचा एक फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सुंदर भावना आहे. भारताने पहिल्यांदा मिस युनिव्हर्स जिंकल्याच्या २८ वर्षानिमित्त अभिनंदन. वेळ निघून जाते, पण सौंदर्य कायम राहते.” सुष्मिताच्या या पोस्टवर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तिच्या या पोस्टवर चिच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले की, “मॅडम, तुम्ही पूर्वीसारखेच आहात, भोलेनाथने नेहमी सुरक्षित ठेवावे, अशी माझी इच्छा आहे.” आणखी एका ट्विटर युजरने तिचे कौतुक केले आणि अभिनेत्रीला सर्वात सुंदर म्हटले. (sushmita sen became miss universe 28 years ago on this day)
Beautiful is a feeling ???????????????? Happy 28 years of INDIA winning Miss Universe for the very first time!!????????????????Time flies…Beauty remains!!!????#Love #Pride #Motherland #MissUniverse1994 #INDIA ???????????? Mahal Kita #Philippines ❤️ pic.twitter.com/LxMqU4ntx2
— sushmita sen (@thesushmitasen) May 21, 2022
विजेतेपद पटकावल्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण
मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर सुष्मिताला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी त्यांना चित्रपटांमध्ये पहिला ब्रेक दिला. ‘दस्तक’ असे या चित्रपटाचे नाव होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. यानंतर तिला सलमान खानसोबत (Salman Khan) डेव्हिड धवनच्या (David Dhawan) ‘बीवी नंबर १’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने तिला बॉलिवूडमध्ये एका वेगळ्या स्थानावर नेले. ‘बीवी नंबर १’ मधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सुष्मिता सेनेने आता ओटीटीवर पाऊल ठेवले आहे. ‘आर्या’ आणि ‘आर्या २’मध्ये ती दमदार भूमिका साकारताना दिसली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा