Tuesday, May 21, 2024

IND vs AUS: 2023:टीम इंडियाला चिअर करण्यासाठी उर्वशी रौतेला पोहोचली अहमदाबाद; म्हणाली…

जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यात आज उत्साहाची चमक दिसून येत आहे. कारण आज 2023 क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ तयार आहे आणि आपला चौथा विश्वचषक जिंकण्याची तयारी करत स्टेडियमवर पोहोचला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील ICC विश्वचषक 2023चा अंतिम सामना रविवारी 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे.

सामना सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. अशा परिस्थितीत या शानदार सामन्याचा आनंद घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटीही अहमदाबादला पोहोचले आहेत. काल अभिनेता विवेक ओबेरॉय त्याचा मुलगा विवानसोबत अहमदाबादला पोहोचला होता आणि आता उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिथे पोहोचली आहे. उर्वशीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने टीम इंडियाच्या विजयाबद्दल आणि तिच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल सांगितले आहे.

उर्वशी रौतेलाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री विमानतळावर दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी मीडियाने तिला पाहिले आणि वर्ल्ड कप फायनलबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. या प्रश्नांना उत्तर देताना उर्वशी रौतेला म्हणाली, ‘मी खूप उत्साहित आहे. मला विश्वास आहे की भारत विश्वचषक ट्रॉफी जिंकेल.”

उर्वशी रौतेलाने विश्वचषक ट्रॉफी हातात घेऊन चुंबन घेण्याचा अनुभवही शेअर केला. यानंतर जेव्हा मीडियाने विचारले की तुमचा आवडता खेळाडू कोण?यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली की, “संपूर्ण टीम माझी फेव्हरेट आहे.”

यापूर्वी अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने सांगितले होते की,15 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत आणि पाकिस्तान विश्वचषक सामन्यादरम्यान तिचा आयफोन हरवला होता. (Urvashi Raute reached Ahmedabad to cheer Team India)

आधिक वाचा-
World Cup 2023 Final | भारत टीमला सपोर्ट करण्यासाठी ‘हे’ कलाकार अहमदाबादला रवाना, जर्सीने वेधले लक्ष
ब्रेकिंग! ‘धूम’च्या दिग्दर्शकांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाहते शोकसागरात

हे देखील वाचा