Saturday, July 27, 2024

ब्रेकिंग! ‘धूम’च्या दिग्दर्शकांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; चाहते शोकसागरात

मनोरंजन विश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय गढवी यांचे निधन झाले आहे. त्यांनी रविवार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 57व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय गढवी (Sanjay Gadhvi) हे सकाळी लोखंडवाला बॅकरोड येथे फिरायला जात असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते घामाने भिजले. यानंतर संजय गढवी यांना तातडीने जवळच्या सर्वात मोठ्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी संजय गढवी यांना मृत घोषित केले.

‘धूम’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गडवी यांच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांचे या जगातून जाणे बॉलीवूडचे मोठे नुकसान आहे. दिग्दर्शक संजय गढवी यांचे पार्थिव सध्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात आहे. 19 नोव्हेंबरच्या रात्री उशिरापर्यंत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक नामवंत व्यक्ती सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी बॉलिवूडला अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.

संजय गडवी हे लोखंडवाला अंधेरी पश्चिम येथील ग्रीन एकर सोसायटीत राहत होते. नुकतेच संजय गढवी यांनी श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीच्या वादावर आधारित चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशिदीच्या वादावर आधारित या चित्रपटाचे शूटिंगही सुरू झाले होते. संजय गढवी यांनी ‘धूम’ आणि ‘धूम 2’ दिग्दर्शित केले होते. त्यांनी ‘तेरे लिए’, ‘किडनॅप’, ‘मेरे यार की शादी है’, ‘ऑपरेशन परिंदे’ आणि ‘अजब गजब लव्ह’ यांसारख्या शानदार चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. (Dhoom director Sanjay Gadhvi passed away due to heart attack)

आधिक वाचा-
‘विजय देवरकोंडा जास्त आवडतो की मी?’ रणबीर कपूरच्या प्रश्नावर रश्मीकाने दिले ‘असे’ उत्तर
World Cup 2023 Final | भारत टीमला सपोर्ट करण्यासाठी ‘हे’ कलाकार अहमदाबादला रवाना, जर्सीने वेधले लक्ष

हे देखील वाचा