Friday, July 5, 2024

कौतुकास्पद! सुष्मिता सेनला ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्काराने करण्यात आले सन्मानित; खास प्रसंगी बॉयफ्रेंडही दिसला सोबत

नुकतेच शुक्रवारी (१६ एप्रिल) बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिला ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. महिला सशक्तीकरण आणि समाजकल्याण या योगदानाबद्दल सुष्मिताला हा पुरस्कार देण्यात आला आहे. या आनंददायी प्रसंगी, सुष्मिताने लाईव्ह सेशन आयोजित केले आणि ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसह शेअर केली. त्याचवेळी या व्हिडिओमध्ये आणखी एक विशेष गोष्ट पाहायला मिळाली, तो म्हणजे तिचा बॉयफ्रेंड रोहमन. होय, या लाईव्ह सेशनमध्ये सुष्मितासोबत तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलही दिसला.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर सुष्मिता चाहत्यांच्या समोर आली. तिने असेही म्हटले की, या पुरस्कारासाठी वडिलांना आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटेल कारण, त्यांनी बरेच वर्षे भारतीय वायुसेनेत देशसेवा केली आहे. यासह, या व्हिडिओच्या माध्यमातून सुष्मिताने तिच्या कुटुंबीयांचीही चाहत्यांशी ओळख करून दिली. तिथे रोहमनही त्यांच्यासोबत दिसला. दरम्यान, सुष्मिताने त्याला स्क्रीनवर बोलावले. मात्र, रोहमन केवळ काही सेकंदांसाठीच व्हिडिओमध्ये दिसला.

सुष्मिता सर्वात अगोदर म्हणाली की, ती तिच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याकारणाने बऱ्याच दिवसांनी तिच्या चाहत्यांना भेटत आहे. यासह, अभिनेत्रीने कोरोना साथीच्या रोगाबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला सर्वांना दिला. ती म्हणाली की, “जान है तो जहान है,” म्हणून सर्व व्यवस्थित राहा.

सुष्मिता अखेरच्या वेळेस तिच्या ‘आर्या’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. आता चाहते या सीरिजच्या दुसर्‍या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुष्मिताने सांगितले की, तिने याच्या दुसऱ्या सिझनचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि ते लवकरच रिलीझ करण्यात येईल. तसेच, सुष्मिता बर्‍याच वर्षांनंतर ‘आर्या’ या सीरिजद्वारे अभिनयात परतली आणि या सीरिजला खूप प्रेमदेखील मिळाले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राहुल वैद्य अन् दिशा परमारचे बहुप्रतिक्षित गाणे झाले रिलीझ; तीनच दिवसात मिळाले १ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

-मातीशी नाळ जोडलेला अभिनेता पंकज त्रिपाठीने सर्वांसमोर केला बिहारचा ‘लौंडा’ डान्स, ‘द कपिल शर्मा शो’मधील व्हिडिओ व्हायरल

-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा

-बोल्डनेससाठी चर्चेत राहणारी अभिनेत्री लागली ढसा ढसा रडू, पाहा तिचा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा