Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड ‘तीनवेळा होता होता राहिलं लग्न, कारण माझ्या मुली’; सुष्मिता सेनचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा

‘तीनवेळा होता होता राहिलं लग्न, कारण माझ्या मुली’; सुष्मिता सेनचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा

सुष्मिता सेन (Sushmita Sen) बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतीच ती बऱ्याच दिवसांनी ‘आर्या’ या वेब सीरिजमध्ये दिसली आणि यातही तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. ती एक सिंगल मदर आहे, तिने लग्न केले नाही. तिच्या दोन मुली रेनी सेन आणि अलिसा हे तिच्या लग्न न होण्यामागे कारण नसल्याचं अभिनेत्रीने स्पष्ट केलं आहे. मिस युनिव्हर्सने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. तिने तीनदा लग्न करण्याचा प्रयत्न केला आणि तिन्ही वेळा ‘देवाने तिला वाचवले’ असा खुलासा केला आहे. 

नुकतेच तिचे बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाले. मात्र दोघांमधील संबंध चांगले आहेत. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि पोस्ट कमेंट करत राहतात. तसेच तिच्या सौंदर्य स्पर्धेतील विजयाची २८ वर्षे साजरी करण्यासाठीही रोहमन सामील झाला होता. (sushmita sen reveals she came close to getting married thrice)

सुष्मिताने ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) ट्वीक इंडियाच्या मुलाखतीत सांगितले की, “कोणीही येऊन माझ्या जबाबदाऱ्या वाटून घेईल, हे मला चालणार नाही. मला त्याची गरज नाही.” लग्नाबद्दल बोलताना सुष्मिता म्हणाली, “सुदैवाने मला माझ्या आयुष्यात काही खूप मनोरंजक पुरुष भेटले, पण गोष्टी लग्नापर्यंत पोहोचता पोहोचता राहिल्या. माझे लग्न न होण्याचे कारण माझी मुले नाहीत.”

“माझी मुलं खूप लाडकी आहेत आणि माझ्या दोन्ही मुलांनी माझ्या आयुष्यातल्या लोकांना खुल्या मनाने स्वीकारलं आहे. त्यांनी सर्वांना समान प्रेम आणि आदर दिला आहे. हे पाहणे माझ्यासाठी सर्वात सुंदर गोष्ट आहे. ती पुढे म्हणाली, “मी तीनदा लग्न करण्याच्या प्रयत्न केला, देवाने मला तीन वेळा वाचवले. या दरम्यान काय झाले ते मी सांगू शकत नाही. देवाने माझे रक्षण केले, कारण देव या दोन मुलांचे रक्षण करत आहे. मी कोणत्याही संकटात पडू इच्छित नाही.”

सुष्मिताने मिस युनिव्हर्स १९९४ स्पर्धा जिंकली आणि १९९६ मध्ये महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटातून पदार्पण केले. तिने ‘बीवी नंबर १’, ‘फिजा’, ‘आंखे’, ‘मैं हूं ना’ आणि ‘मैने प्यार क्यूं किया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने २०२० मध्ये ‘आर्या’सोबत पुनरागमन केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा