बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (sushmita sen) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९९६ मध्ये दस्तक या चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिनं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलयं. सुश्मिता कधी वैयक्तिक जीवनामुळे तर कधी चित्रपटांमुळे चर्चेत असते. अवघ्या १८ वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेल्या सुश्मिताने धक्कादायक अनुभव आपल्या चाहत्यांना शेअर केला आहे.
१९९४ मध्ये मिस युनिव्हर्स या सौंदर्यस्पर्धेत तिने ‘मिस युनिव्हर्स’ म्हणजेच विश्वसुंदरी हा किताब पटकावला. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली. यावेळी घडलेला प्रकार सुश्मिताने नुकताचं शेअर केला आहे. हा किताब पटकवल्यानंतर टेबल मॅनर्स शिकले. त्यापूर्वी, तिला जेवण कसे करावे याबद्दल काहीही माहिती नसल्याचे सुश्मिताने म्हटलं आहे.
सुष्मिता म्हणाली, “मिस युनिव्हर्स जिंकण्यापूर्वी मी टेबल मॅनर्स शिकले नव्हते. ते जिंकल्यानंतर त्यांनी मला मेक्सिको सिटीमध्ये एका ठिकाणी पाठवले. मी 18 वर्षांची होते, मला इंग्रजी बोलता येत नव्हते. बराच वेळ तिथे नुसती बसून होते. ‘जेव्हा मला आता भूक सहन होत नव्हती, तेव्हा मी माझ्या ट्रॅव्हल मॅनेजरला सांगितले की, मला खूप भूक लागली आहे. तो माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला की आम्हालाही खूप भूक लागली आहे. तुम्ही येथे प्रमुख पाहुणे आहात. तुम्ही सुरुवात करू शकता.”
सुश्मिता पुढे म्हणाली, सात कोर्सच्या जेवणाची सुरुवात कशी करावी माहिती नव्हते. यावेळी मेक्सिकोच्या पर्यटन व्यवस्थापकाने मला मदत केली. . अभिनेत्री म्हणाली, “मला खूप अस्ताव्यस्त वाटले आणि मला ते पुन्हा अनुभवायचे नव्हते. मी शिकलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे पोटभर जेवल्यानंतर घर सोडणे, जेणेकरून मला तेथे जाऊन जेवण करण्याचा मोह होणार नाही. तुम्ही नंतर म्हणू शकता, ‘ काही नाही, धन्यवाद’. तेव्हा लोकांना कळेल की तुम्ही कठोर डाएटच्या प्लॅनचे पालन करता.
सुश्मिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सुश्मिताने ‘आर्य 3’ आणि ‘ताली’ मधील अभिनयाने आपल्या चाहत्यांचा मनावर एक वेगळाच ठसा उमटवला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
लग्नाच्या 3 वर्षानंतर वरून धवन होणार बाप, सोशल मीडियावर केली घोषणा
मृत्यूची खोटी बातमी देणारी पोस्ट डिलीट करून पूनम पांडेने दिले नवे अपडेट, लोकांनी केला संताप व्यक्त