Wednesday, December 4, 2024
Home बॉलीवूड रोहमन शॉलसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर २०२१ वर्षातील उतार चढावांवर सुश्मिता म्हणाली,

रोहमन शॉलसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर २०२१ वर्षातील उतार चढावांवर सुश्मिता म्हणाली,

बॉलिवूडमध्ये रिलेशनमध्ये असणे आणि ब्रेकअप होणे ही खूपच सामान्य बाब आहे. त्यामुळे अनेकदा लोकं देखील या बातम्यांकडे कानाडोळा करताना दिसतात. मागील काही काळापासून अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) सतत तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच सुश्मिताने तिचे आणि तिच्या बॉयफ्रेंड असलेल्या रोहमान शॉलसोबत (Rohman Shawl) ब्रेकअप झाल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले. त्यानंतर ती सतत चर्चेत आहे. आता सुश्मिताने पुन्हा एकदा तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. यातच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत २०२१ वर्षात तिच्या जीवनात आलेल्या उतार चढावांबद्दल सांगितले आहे.

अभिनेत्री सुश्मिता सेनने २०२१ वर्षांचा निरोप घेत २०२२ या नव्या वर्षात प्रवेश करण्याआधी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका मोठी पोस्ट शेअर करत २०२१ वर्षातील चांगल्या वाईट आठवणींना उजाळा दिला आहे. सुश्मिताने पांढऱ्या रंगाच्या आकर्षक आणि स्टायलिश ड्रेसमध्ये तिचा अतिशय हसरा फोटो शेअर करत लिहिले, “मुलींना त्यांचे कौतुक नेहमीच आवडते. माझी टाइमलाईन खूपच चांगल्या लोकांनी भरली आहे…माझ्या जीवनाचा भाग होण्यासाठी आणि माझ्या प्रवासावर विश्वास ठेवण्यासाठी त्या सर्व चांगल्या लोकांचे आभार…२०२१ हे अनेक चांगल्या वाईट अनुभवांसोबत चांगले वर्ष राहिले.”

पुढे सुश्मिताने लिहिले, “यावर्षीच्या शेवटी मी स्वतःला कृतज्ञतेच्या भावनांनी ओतप्रोत समजत आहे. त्या सर्व चांगल्या गोष्टी ज्या माझ्या आयुष्यात आल्या. तू माझ्या आयुष्यातील मोठा भाग आहेस. मी तुम्हा सर्व लोकांवर खूप प्रेम करते. २०२२ हे वर्ष अतुलनीय वर्ष असो या अशा आणि अपेक्षेसह खूप आनंद.” यासोबत तिने हॅशटॅग देत लिहिले, ‘हे सर्व तुझ्यासाठीच होत आहे.”

सुश्मिता सेनने मागच्याच आठवड्यात तिच्या आणि रोहमना शॉलच्या ब्रेकअपबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली. तिने त्या दोघांचा एक फोटो शेअर करत लिहिले, “आपण मैत्रीपासून सुरुवात केली. पुढे देखील आपण मित्र राहू. नाते संपले तरी प्रेम असेल.” काही दिवसांपूर्वीच सुश्मिताची बहुप्रतिक्षित ‘आर्या 2’ ही सिरीज प्रदर्शित झाली जिला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला.

हेही वाचा :

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा