Wednesday, April 30, 2025
Home वेबसिरीज ‘आर्या २’ च्या ट्रेलरला ३० मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज, सुष्मिता सेनने पोस्ट शेअर करून मानले आभार

‘आर्या २’ च्या ट्रेलरला ३० मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज, सुष्मिता सेनने पोस्ट शेअर करून मानले आभार

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनच्या (sushmita sen) आर्या २ (Aarya 2) वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, ट्रेलरला आतापर्यंत ३० मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज आले आहेत. तसेच यावर ज्याप्रकारे प्रतिक्रिया मिळत आहेत. त्यावरून ही गोष्ट लक्षात येत आहे की, वेबसीरिजचा दुसरा भाग कमाल करणार आहे. सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबाबत आभार मानले आहेत. तसेच या यशाचा आनंद ती तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल आणि मुलींसोबत साजरा करत आहे.

प्रेक्षकांचे आभार मानताना तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आर्या २ च्या ट्रेलरला सगळ्यांनी प्रेम दिले. ३० मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज देऊन प्रेम देणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना प्रणाम.” (Sushmita Sen shares good new, celebarting it with boyfriend and daughters)

राम माधवानी यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेल्या ‘आर्या’ या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागात एका आईचा प्रवास दाखवला आहे. जी तिच्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या रक्षेसाठी अपराध आणि दुष्मनांशी लढते. या सीरिजमध्ये सिकंदर खेर, विकास कुमार, मेयो साराओ, अंकुर भाटिया, आकाश खुराना आणि दिलनाज इराणी हे कलाकार आहेत. ही वेबसीरिज १० डिसेंबर रोजी डिझ्नी प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम केली जाणार आहे.

‘आर्या २’ च्या ट्रेलरबाबत बोलायचे झाल्यास, ही एक अँक्शन थ्रिलर वेबसीरिज असणार आहे. हा ट्रेलर प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या ट्रेलरमध्ये सुष्मिता सेन एका नव्या रुपात दिसत आहे. तसेच तिच्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी लढताना दिसत आहे. मागील सिझनमध्ये आपण पाहिले आहे की, सुष्मिता सेन तिच्या पतीची हत्या करून तिच्या मुलांना घेऊन देश सोडून निघून जाते.

हे देखील वाचा